Shir Riddhi Siddhi Mahaganpati | नागनाथपार सदाशिव पेठ येथील ऋद्धी सिद्धी महागणपतीच्या महाराष्ट्रीयन शैलीच्या  मंदिराचे उद्या उद्घाटन 

HomeBreaking News

Shir Riddhi Siddhi Mahaganpati | नागनाथपार सदाशिव पेठ येथील ऋद्धी सिद्धी महागणपतीच्या महाराष्ट्रीयन शैलीच्या  मंदिराचे उद्या उद्घाटन 

Ganesh Kumar Mule Feb 21, 2026 8:24 PM

Maharashtra Budget 2025-26 | दिशाही नाही, दृष्टीही नाही – हा अर्थसंकल्प तरुणांच्या भविष्यावर अन्याय करणारा आहे! – प्रथमेश आबनावे
PMC 75th Anniversary | पुणे महापालिका सर्व माजी नगरसेवकांना आणणार एकत्र!
Palkhi Sohala 2023 | Pune Traffic Updates | श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी वाहतुकीत बदल

Shir Riddhi Siddhi Mahaganpati | नागनाथपार सदाशिव पेठ येथील ऋद्धी सिद्धी महागणपतीच्या महाराष्ट्रीयन शैलीच्या  मंदिराचे उद्या उद्घाटन

 

Nagnathpar Sadashiv Peth – (The Karbhari News Service) – संपुर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे १४ विद्या अन ६४ कलांचा दाता, श्री गजानन ! ऐतिहासिक नागनाथपार सदाशिव पेठ येथिल असेच एक १३४ वर्ष जुने श्री गजाननाचे स्थान म्हणजे श्री ऋद्धी सिद्धी महागणपती! मंडळाने यंदा महागजाननाची नुतन मुर्ती घडवलेली आहे. हिडी सिद्धी सहीत सिंहासनावर आसनस्थ “श्री महागणेशाची मंगलमुर्ती’ केवळ अद्वितीय अशी आहे. तसेच ऋद्धी सिद्धी महागणतीसाठी मागिल दोन वर्षाच्या अथक कामानंतर मंडळाने “श्रीं” चे भव्यदिव्य असे महाराष्ट्रीयन शैलीचे मंदिर उभारलेलं आहे. श्रींच्या नुतन मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना व श्रींच्या भव्य मंदिराचे उद्घाटन शके १९४७ फाल्गुन शुक्ल तृतिया म्हणजेच  २० फेब्रुवारी ते फाल्गुन शुक्ल षष्ठी म्हणजेच द २३ फेब्रुवारी २०२६ या दिवसांच्या शुभ मुहुर्तावर करण्याचे योजले आहे. (Pune Ganesh News)

शके १९४७ फाल्गुन शुक्ल चतुर्थी म्हणजेच दि. २१ फेब्रुवारी २०२६ सकाळी ११.०० ते ३.०० श्रींच्या नुतन मुर्तीचा धान्य निवास,
– जलाधिवास, स्नानविधी मंदिर प्रासाद वास्तु शांती

शके १९४७ फाल्गुन शुक्ल पंचमी म्हणजेच दि. २२ फेब्रुवारी २०२६ सकाळी ११.०० ते ३.०० श्रींची नुतन मुर्ती प्राणप्रतिष्ठापना विधी,
– मंदिर प्रासाद शुद्धी व महंत मोहनबुवा रामदासी यांचे शुभहस्ते मंदिर कलशारोहण व मंदिर उद्घाटन सोहळा
शके १९४७ फाल्गुन शुक्ल षष्ठी म्हणजेच दि. २३ फेब्रुवारी २०२६ सकाळी ११.०० ते ३.०० ब्रम्हणस्पती सुक्त जप, श्री अथर्वशिर्ष गणेशयाग.


हे मंदिर मराठी मंदिर शैलीचा उत्तम नमुना असुन मंदिर शास्त्राचा सखोल अभ्यास करून पारंपारीक पद्धतीने हे भव्य मंदिर उभारले गेले आहे. मंदिरास १४ उपकळस असुन १ मुख्य कळस आहे. अत्यंत बारीक कलाकुसर तसेच पुरातन प्रतिकांचा व शिल्पांचा वापर मंदिर बनवताना केलेला आहे. त्यामुळे हे मंदिर भव्यदिव्य व नयन मनोहर असे आहे. या मंदिराचे वास्तुविशारद व वास्तुशिल्पी श्री सर्वेश पवार व गोविंद वांजळे हे आहेत.
ऋद्धी सिद्धी सहीत महागजाननाची अव्दितीय मुर्ती शास्त्रांमधे वर्णन केल्याप्रमाणे व पुर्ण धार्मिक पद्धतीने बनवलेली आहे. या मुर्ती मधे ‘“गणेशयंत्र’” सिद्ध करुन स्थापित केलेले आहे या योगे या मुर्ती मधे श्री गजानानाचा प्रत्यक्ष वास असुन ऋिद्धी सिद्धी सहीत असल्याने हा गजानन त्याच्या सर्व भक्तगणांचे सर्व संकल्प मनोरथ सिद्ध करणारा असा आहे. श्रींची मुर्ती  थोपटे सर यांनी घडवलेली आहे.

या मंदिराचे कलशारोहण खतगाव येथिल समर्थ रामदास स्वामी मठाचे मठपती महंत मोहनबुवा रामदासी यांचे करकमलांनी पुर्णपणे धार्मिक व पावन वातावरणात ब्रम्हवृंदांच्या मंत्रोच्चारात होणार आहे. तसेच मंदिराचे उद्घाटन शुभहस्ते पार पडणार असून त्यानंतरच्या कार्यकमास पुण्यातील सर्व मान्यवर, भक्तगण, कार्यकर्ते उपस्थित राहुन शोभा वृद्धिंगत करणार आहेत. हे मंदिर आणि हा हृद्य सोहळा सर्व भक्तजनांच्या डोळयाचे पारणे फेडणारा व अनेक वर्ष लक्षात राहील असा भव्य प्रमाणात साजरा होणार आहे. या कार्यक्रमास सर्व पुणेकर तसेच सर्व गणेश भक्तांना जाहीर आमंत्रण आहे. असे आवाहन  श्री नागनाथपार सार्वजनिक गणपती न्यास, सदाशिव पेठ, पुणे यांनी केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: