Sharad Pawar | अजित पवार यांनी बारामतीत विकास केला, तरी लोकांनी तुम्हाला का निवडलं? या प्रश्नांवर शरद पवार काय म्हणाले?
Sharad Pawar Vs Ajit Pawar – (The Karbhari News Service) – अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामतीत विकास केला, तरी लोकांनी तुम्हाला का निवडलं? असा पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांना (Sharad Pawar) बारामती लोकसभेबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना पवारांनी ‘अरे ती बारामती आहे’ असे बोलताच परिषदेत हशा पिकला. (Baramati Loksabha Constituency)
बारामती लोकसभा मतदारसंघातील सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची नणंद- भावजयमध्ये लढत पाहायला मिळाली. देशात या लढतीची चर्चा झाली होती. राष्ट्रवादीत अजित पवारांनी बंडखोरी केल्यानंतर दोन गट पडले. एक गट शरद पवार आणि दुसरा अजित पवार यांचा गट होता. म्हणजेच बारामतीत एका प्रकारे काका पुतण्या यांची लक्षवेधी लढत होणार असल्याचे म्हंटल जात होत. देशाचे लक्ष लागलेल्या निवडणुकीत बारामतीत सुप्रीया सुळेंनी विजय मिळवला. तब्बल लाखांच्या फरकाने सुनेत्रा पवार पराभूत झाल्या होत्या.
पवार म्हणाले, बारामतीत लोकांशी वैयक्तिक संबंध ठेवले पाहिजेत. आधी मी 50 टक्के लोकांना नावानं ओळखत होतो. पण ती जुनी लोकं आता नाहीत. पण मला खात्री होती की, लोक सुप्रियाला निवडून देतील. अजित पवारांना घरात स्थान, मात्र पक्षात घ्यायचं की नाही याचा निर्णय कार्यकर्तेच घेतील असाही शरद पवारांनी यावेळी सांगितलं.