सेव्हन लव्हज चौक ते वखार महामंडळ उड्डाणपुलास अखेर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपूल हे नाव
: नाव समितीची मान्यता
पुणे : प्रभाग क्रमांक २८ सॅलसबरी पार्क – महर्षीनगर येथे नव्याने विकसित झालेल्या सेव्हन लव्हज चौक ते वखार महामंडळ उड्डाणपुलास (Bridge) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपूल असे नाव देणे बाबत प्रस्ताव आला होता. मात्र स्थानिक नगरसेवकांच्या मतभेदामुळे हा प्रस्ताव तसाच पडून होता. प्रशासनाने देखील याचा चेंडू नाव समितीच्या कोर्टात ढकलला होता. अखेर नाव समितीने (Name Commitee) या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
: प्रशासनाने नाव समितीवर ढकलला होता निर्णय
नाव समितीने या प्रस्तावाबाबत प्रशासनाचा अभिप्राय मागितला होता. अभिप्रायानुसार प्रभागामधील एकुण चार सभासदापैकी सभासद श्रीनाथ भिमाले यांनी सूचक व कविता वैरागे, प्रविण चोरबेले, राजश्री शिळीमकर. यांनी अनुमोदक म्हणून जोडलेल्या पत्रावर स्वाक्षरी केली आहे. मुख्य सभा ठराव क्रमांक ५०९ दिनांक १०.११.२०१७ मधील अ.क्र. ५ नुसार पूर्वी एखाद्या मान्य झालेल्या नावाचा प्रस्ताव जागा बदलून परत नामकरणासाठी सादर झाल्यास त्याचा विचार केला जाणार नाही. खात्याकडील उपलब्ध कागदपत्रांनुसार प्रस्तावातील सुचविलेल्या पुलास मान्य नाव नाही. प्रभाग क्रमांक ६ मध्ये यापूर्वी मुख्य सभा ठराव क्रमांक ३४१ दिनांक २५.०७.२०११ अन्वये हे नाव दिले असल्याने सुचविलेल्या पुलास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपूल असे नाव देणे विषयी नाव समितीने निर्णय घेणे योग्य होईल. असा अभिप्राय प्रशासनाने दिला होता. त्यानुसार समितीने सेव्हन लव्हज चौक ते वखार महामंडळ उड्डाणपुलास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपूल असे नाव देण्यास मंजुरी दिली आहे.
COMMENTS