Savitri Award | पुणे मनपाच्या सहायक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांना यंदाचा ‘सावित्री’ पुरस्कार जाहीर

HomeBreaking Newsपुणे

Savitri Award | पुणे मनपाच्या सहायक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांना यंदाचा ‘सावित्री’ पुरस्कार जाहीर

Ganesh Kumar Mule Jul 25, 2023 3:41 PM

LaQshya Programme | माता आणि बाल मृत्यू कमी करण्याबाबत पुणे महापालिकेची राष्ट्रीय स्तरावर दखल 
PMC Pune Health Schemes | आरोग्य योजनांमध्ये पुणे महापालिकेची रँकिंग सुधारली!
Teleconsultation service : पुणे महापालिका 54 दवाखान्यात देणार टेलिकन्सल्टेशन सेवा! 

Savitri Award | पुणे मनपाच्या सहायक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांना यंदाचा ‘सावित्री’ पुरस्कार जाहीर

 

Savitri Award ‘सावित्री फोरम’तर्फे पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) सहाय्यक आरोग्यअधिकारी डॉ. वैशाली जाधव (Assistant Health Officer Dr Vaishali Jadhav) यांना स्त्री भ्रूण हत्या विरोधी कार्य केल्याबद्दल ‘सावित्री’पुरस्कार देऊन गौरवले जाणार आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. याबरोबरच ७५ विद्यार्थिनींना एकूण सुमारे 1 लाख रुपयांची शैक्षणिक मदतही देण्यात येणार आहे. ज्येष्ठ लेखिका सौ. वर्षा गजेंद्रगडकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. हा कार्यक्रम शुक्रवार दि. २८ जुलै रोजी सायं 5 वाजता जवाहरलाल नेहरु ऑडिटोरियम, घोले रोड, पुणे येथे संपन्न होईल अशी माहिती सावित्री फोरमच्या सचिव संयोगिता कुदळे यांनी दिली. (Savitri Award)

 

त्या म्हणाल्या की, सन २०१५मध्ये ही संस्था नोंदणीकृत ट्रस्ट म्हणून स्थापन केली. तेव्हापासून दरवर्षी ७५ मुलींना सुमारे 1 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. सावित्री हा पुरस्कार यावर्षी पासून सुरु करण्यात आला आहे. सावित्री फोरमतर्फे महिलांच्या उन्नतीसाठी अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन दरवर्षी सातत्याने केले जाते. आरोग्य शिबिरे, महिला उद्योजकांसाठी प्रदर्शन, सॅनिटरी पॅडचे वाटप, रक्तदान शिबिर, कपडे गोळा करून गडचिरोलीला पाठवणे, अनाथाश्रम व वृद्धाश्रमात खाऊ वाटप व करमणूकीचे कार्यक्रम, महिलाश्रम येथे कपडे, चादरी वाटप, दंत चिकित्सा शिबिर, मेकअप वर्कशॉप, सायबर क्राईम अवेयरनेस, आहार व आरोग्य, मॉकटेल सरबते बनवणे, राखीआकाशकंदीलपॉट गार्डन बनवणे, व्याख्याने, फॅशन शो, रंगारंग कार्यक्रम, वार्षिक सहल असे अनेक उपक्रम सावित्री फोरमतर्फे दरवर्षी आयोजित केले जातात असे सचिव संयोगिता कुदळे यांनी सांगितले.

——

News Title | Savitri Award | Assistant Health Officer of Pune Municipality Dr. To Vaishali Jadhav This year’s ‘Savitri’ award has been announced