माझ्या मनातील महान काम अमोल तू सत्यात आणले..
: संभाजी राजे छत्रपती यांनी अमोल बालवडकर यांचे केले कौतुक
पुणे : माझ्या मनातील, प्रेरणेतील महान काम अमोल तू सत्यात आणले.. या महान कामासाठी छत्रपती शिवाजी महाराज तुला कायम आशीर्वाद देत राहतील.. अशा शब्दात युवराज छत्रपती संभाजी महाराज भोसले (Sambhaji Raje Chaptrapati) यांनी नगरसेवक अमोल बालवडकर (Amol Balwadkar) यांचे कौतुक केले. तर आजचा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्ण क्षण आहे. आज या अनमोल आशीर्वादाने मी धन्य झालो. असे भावनिक उद्गार अमोल बालवडकर यांनी काढले.
: एकत्रित स्मारकाचे भूमिपूजन संपन्न
बालवडकर यांनी सांगितले, स्वराज्य संकल्पक शहाजी राजे, राजमाता जिजाऊसाहेब, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्रातील पहिले एकत्रित स्मारक बालेवाडी येथे साकार होत आहे. या कामापेक्षा महान काम माझ्या हातून उभ्या आयुष्यात होणे शक्य नाही. आज या महान कामाचा भूमिपूजन समारंभ युवराज संभाजीराजे छत्रपती (खासदार) यांच्या हस्ते संपन्न झाला..
समारंभास ह.भ.प.चंद्रकांत महाराज वांजळे, ह.भ.प.शेखरमहाराज जांभुळकर, भाजपाचे जेष्ठ नेते प्रकाशतात्या बालवडकर, नगरसेविका स्वप्नालीताई प्रल्हाद सायकर, नगरसेविका ज्योतिताई गणेश कळमकर, स्वाभिमानी संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाशतात्या बालवडकर, भाजपा युवा नेते लहुशेठ बालवडकर, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेशजी कळमकर, प्रदेश उपाध्यक्ष भाजपा ओ.बी.सी. प्रल्हादजी सायकर, भाजपा युवा नेते राहुलजी कोकाटे, भाजपा कोथरूडचे सरचिटणीस सचिनजी पाषाणकर, प्रभाग क्र. ९ भाजपा अध्यक्षा उमाताई गाडगीळ, प्रभाग क्र. ९ भाजपा महिला अध्यक्षा अस्मिताताई करंदीकर, सुसचे माजी सरपंच नारायणराव चांदेरे, मा. सरपंच काळुराम गायकवाड, पुणे जिल्हा भूमाता किसान मोर्चाचे अध्यक्ष अनिल तात्या बालवडकर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाशजी तापकीर, सुसचे भाजपा युवा नेते अनिलबाप्पु ससार, कोथरूड आयटी सेलचे अध्यक्ष मंदार राराविकर, हभप चंद्रकांत वांजळे, हभप शेखर जांभुळकर तसेच बालेवाडीतील समस्त शिवप्रेमी व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी शिल्पकार सुभाष भरेकर व अमित भरेकर, कंत्राटदार अनिल धोत्रे (मे.आर.आर.धोत्रे), अनुराधा येडके, शाहिर अरुण गायकवाड, शस्त्रास्त्र तज्ञ राकेश राव यांचा सत्कार करण्यात आला..
COMMENTS