RPI – BJP Yuti Pune | रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले) च्या वाट्याला ९ जागा!
RPI Pune – (The Karbhari News Service) – महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले) यांची युती असून पक्षाला पुणे महानगरपालिका निवडणुकीत ९ जागा मिळाल्याची माहिती शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. (PMC Election 2025-26)
प्रभाग क्रमांक १ मध्ये राहुल भंडारे, प्रभाग २ अ – रेणुका चलवादी, प्रभाग २ ब – सुधीर वाघमारे, प्रभाग ६ संतोष आरडे, प्रभाग ७ निशा मानवदकर, प्रभाग ८ परशुराम वाडेकर, प्रभाग १३ निलेश आल्हाट, प्रभाग १४ हिमाली कांबळे आणि प्रभाग २२ मधून बापू कांबळे यांना उमेदवारी मिळाली आहे.
पुढे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, भाजपकडे आम्ही १५ जागांची मागणी केली होती, वाटाघाटी मध्ये भाजपाने आम्हाला ९ जागा दिल्या आहेत. यामध्ये ६ पुरूष आणि ३ महिलांचा समावेश असून सामजिक संतुलन राखण्यात आले आहे, आरपीआयच्या उमेदवारांमध्ये ५ बौद्ध, ३ मातंग आणि एक धनगर उमेदवार आहे. आम्ही युती म्हणून महापालिका निवडणुका लढवणार असून पुणे महापालिकेवर भाजप – आरपीआयची सत्ता येईल असा विश्वास शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, शहर प्रभारी शैलेंद्र चव्हाण, परशुराम वाडेकर, महिपाल वाघमारे, शाम सदाफुले, मोहन जगताप, महिला अध्यक्ष हिमाली कांबळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS