River Festival 2025 |  नदी महोत्सव २०२५- स्वच्छ नदी, सुंदर पुणे | भिडे पूलापासून ते म्हात्रे पूल पर्यंत स्वच्छता मोहीम!

Homeadministrative

River Festival 2025 |  नदी महोत्सव २०२५- स्वच्छ नदी, सुंदर पुणे | भिडे पूलापासून ते म्हात्रे पूल पर्यंत स्वच्छता मोहीम!

Ganesh Kumar Mule Nov 27, 2025 9:07 PM

Water Issue | बाणेर-बालेवाडीची पाणी समस्या एप्रिल अखेरीस सुटण्याची शक्यता | अमोल बालवडकर यांचा सातत्याने पाठपुरावा
CNG Price Decrease | MNGL ने पुणे परिसरात CNG च्या किमती कमी केल्या
Recruitment | PMC Pune | पुणे महापालिका भरती | महापालिकेकडून नवीन उमेदवारांच्या हंगामी नेमणुका! | आता लिपिक पदाच्या परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा

River Festival 2025 |  नदी महोत्सव २०२५- स्वच्छ नदी, सुंदर पुणे | भिडे पूलापासून ते म्हात्रे पूल पर्यंत स्वच्छता मोहीम!

 

Pune News – (The Karbhari News Service) – नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा हा “RIVER WEEK” तसेच २ डिसेंबर हा “राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस” म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या अनुषंगाने पुणे शहरातील मुठा नदीपात्रातील स्वच्छता करणेसाठी “नदी महोत्सव स्वच्छ नदी, सुंदर पुणे आयोजित केला आहे. (PMC Solid Waste Management Department)

हा नदी महोत्सव पुणे महानगरपालिका, बुवा फॉर अॅक्शन, इकोसन सव्र्हिसेस फाउंडेशन आणि जीवितनदी – लिव्हिंग रिव्हर फाउंडेशन व इतर स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने रविवार  ३० नोव्हेंबर  रोजी सकाळी ७.०० ते १०.०० भिडे पूलापासून ते म्हात्रे पूल पर्यंत स्वच्छता मोहीमद्वारे साजरा करण्याचे नियोजित आहे. (PMC Environment Department)

या महोत्सवात नदी स्वच्छता मोहिम, पथनाट्य, ड्रम-सर्कल्स यांसारखे जनजागृती कार्यक्रम, पर्यावरण विषयक जनजागृती स्टॉल्स असणार आहेत. पर्यावरणीय बांधिलकीला बळकटी देण्यासाठी यामध्ये नागरिक, विद्यार्थी व स्वयंसेवक यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असणे आवश्यक आहे.

कार्यक्रमास पुणे महानगरपालिकेचे आयुक्त  नवल किशोर राम, पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी  जितेंद्र हुडी, आणि पुणे शहराचे पोलिस आयुक्त  अमितेश कुमार इ. मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सदर उपक्रमामध्ये सहभाग नोंदवण्यासाठी नोंदणी लिंक: https://forms.gl/vu4Ch33pn3Q7vinH7

उपक्रमाचा सहभाग मोफत असून सहभागींकरिता माहिती खालीलप्रमाणे:-

स्वच्छता मोहीम भिडे पुल ते म्हात्रे पुल या नदीपात्र रस्त्यावरील नदीपट्ट्यावर आयोजित केली जाणार आहे, संपूर्ण नदीपट्टा ६ विभागामध्ये विभाजित केला आहे या ठिकाणी पोहचण्यासाठी २ प्रवेशद्वारे आहेत.

• झोन १, २ आणि ३ – बाबा भिडे पूल
• झोन ४, ५ आणि ६ – खुडे पथ येथून नदीपात्र रस्त्यावर प्रवेश
·
सहभागींनी त्यांच्या नेमून दिलेल्या झोनमध्ये नदीकाठ स्वच्छ करावा.
• प्रत्येक झोनमध्ये सहभागींसाठी हातमोजे आणि मास्क उपलब्ध करून दिले जातील
• बॅरिकेड केलेल्या भागात किंवा नदीमध्ये उतरू नये, सहभागीनी बंद बूट परिधान करावेत.
• कार्यक्रमादरम्यान रोपे वाटप करण्यात येतील.

तरी अशा या अनोख्या कार्यक्रमात नागरिकांनी उत्साहवर्धक वातवरणात श्रमदान करून, नदी महोत्सव २०२५-स्वच्छ नदी, सुंदर पुणे यामध्ये सहभागी व्हावे असे पुणे महानगरपालिकेतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: