Shivsena UBT Pune | असक्षम गृहमंत्री पायउतार व्हावे- शिवसेना (UBT) पुणे  | लाडकी बहीण असुरक्षित; गृहमंत्री झोपले का ?

HomeBreaking News

Shivsena UBT Pune | असक्षम गृहमंत्री पायउतार व्हावे- शिवसेना (UBT) पुणे | लाडकी बहीण असुरक्षित; गृहमंत्री झोपले का ?

Ganesh Kumar Mule Mar 05, 2025 9:42 PM

Pune Metro News | रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोला झेंडा | पिंपरी चिंचवड ते निगडी मेट्रोचे भूमिपूजन
Lahuji Vastad Salve Smarak | आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन
Property Survey | Devendra Fadnavis | सर्व महानगरपालिका हद्दीतील मालमत्तांचे सर्वेक्षण करणार | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Shivsena UBT Pune |  असक्षम गृहमंत्री पायउतार व्हावे- शिवसेना (UBT) पुणे

| लाडकी बहीण असुरक्षित; गृहमंत्री झोपले का ?

 

 

Pune News – (The Karbhari News Service) – महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती पाहता भाजप खासदार रक्षा खडसे यांची मुलगी असुरक्षित आहे. भाजप बूथ प्रमुख सरपंच संतोष देशमुख ह्यांची सत्तेतील लोकांकडूनच क्रुरपणे हत्या केली जाते. भाजप चा आमदार मंत्री जयकुमार गोरे स्वतःचे विवस्त्र फोटो महिलेला पाठवतो. ह्या सर्व घटना सत्ताधारी लोकांच्याच आहेत. म्हणजे महाराष्ट्राला, सामान्य माणसाला सत्ताधारी लोकांकडूनच धोका आहे हे दिसून येते. आमदार अबू आझमी हा इतिहासाचा अभ्यास नसताना महाराष्ट्रात चुकीचे वक्तव्य करतो. मिंधे चा आमदार तानाजी सावंत हा ७० कोटी चे टेंडर ३००० कोटी वर नेतो आणि ह्या सर्व गोष्टी घडत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री फडणवीस शांत बसले आहेत की महाराष्ट्रात अशांतता पसरवीत आहेत? हा प्रश्न आज सामान्य माणसाला पडला आहे . त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुणे पक्षाच्या वतीने आज डेक्कन गुडलक चौकात सत्ताधारी महायुती सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

यावेळी आजपर्यंतचे सर्वात असक्षम असणारे गृहमंत्री फडणवीस यांचा राजीनामा मागण्यात आला. तसेच धनंजय मुंडे ह्याला ही सरपंच संतोष देशमुख हत्येस जबाबदार धरून कारवाई करण्यात यावी, महिलांसाठी मा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात आणलेला शक्ती कायदा केंद्राने लवकरात लवकर पारित करून घ्यावा. अशी मागणी करण्यात आली. तसेच धनंजय मुंडे यांच्या पोस्टर ला शेण फासून, जोडो मारो आंदोलन करण्यात आले यावेळी महिला शिवसैनिक आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी महिला सुरक्षा विषयावर सरकारला धारेवर धरले महाराष्ट्राला पार्ट टाईम नव्हे तर फुल टाईम गृहमंत्री असावा अशी मागणी करण्यात आली .

यावेळी आंदोलनास शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, महिला सहसंपर्क संघटिका कल्पना थोरवे, उपशहर प्रमुख प्रशांत राणे, शहर संघटक राजेंद्र शिंदे, कार्यालयीन सचिव मकरंद पेठकर, उमेश वाघ, विभाग प्रमुख प्रवीण डोंगरे, मुकुंद चव्हाण, महेश पोकळे, संतोष भुतकर, गोविंद निंबाळकर, राजेश मोरे, अतुल दिघे, अजय परदेशी, विलास सोनवणे, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, युवासेना शहर संघटक राम थरकुडे, युवराज पारिख, चेतन चव्हाण, परेश खांडके, गिरीश गायकवाड, महिला आघाडीच्या अमृता पठारे, ज्योती चांदेरे, सुनीता खंडाळकर, गौरी चव्हाण, रेखा कोंडे, विद्या होडे, मृणमयी लिमये, करुणा घाडगे, सोनाली जुनावणे, स्वाती कथलकर, विजया मोहिते, रोहिणी कोल्हाळ, सुनीता दगडे, स्नेहल पाटोळे, वैशाली कापसे, संजय वाल्हेकर, अनिल परदेशी,अमर मारटकर, ज्ञानंद कोंढरे, अशितोष मोकाशी, नितीन निगडे, गणेश घोलप, नागेश खडके, राहुल शेडगे, शशिकांत सटोटे , आरोग्य सेनेचे रमेश क्षीरसागर, शाम कदम, जुबेर तांबोळी, दिलीप पोमण, जुबेर शेख, अफाक शेख, दिपक चावरिया, रमेश जुनवणे, प्रकाश धामने, प्रकाश चौरे, हेमंत यादव, कैलास बांदल, संजय गवळी, नीरज नांगरे, मयूर कोंडे, अक्षय हबीब, ओंकार मारणे, गणेश वायाळ, मोहन पांढरे, शैलेश जगताप, संतोष होडे, राजेंद्र खंडाळकर, आशिष अढळ, ओंकार मारणे, अमोल घुमे, नितीन दलभंजन व शिवसैनिक उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: