Republic Day Celebrated in PMC Pune | पुणे महानगरपालिकेच्या वतीने भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न 

HomeपुणेBreaking News

Republic Day Celebrated in PMC Pune | पुणे महानगरपालिकेच्या वतीने भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न 

गणेश मुळे Jan 27, 2024 1:46 PM

PMC Employees Promotion | After many months of waiting, the PMC employees were finally promoted
  Pune residents have paid the entire property tax!  Then win a car, phone and laptop from Pune Municipal Corporation!
PMC Pune RRR Centre’s | पुणे महापालिकेकडे जमा झाल्या 30 टन जुन्या वस्तू

Republic Day Celebrated in PMC Pune | पुणे महानगरपालिकेच्या वतीने भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

 

Republic Day Celebration in PMC Pune | पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation PMC)  वतीने भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day 2024)  विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पुणे महानगरपालिकेच्या प्रांगणातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास व महात्मा ज्योतीबा फुले यांचे पुर्णाकृती पुतळ्यास तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास प्रशासक तथा महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Pune Municipal Commissioner IAS Vikram Kumar) यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. (Republic Day Celebration in PMC Pune)

ध्वजारोहन व ध्वजवंदन करण्यापूर्वी महात्मा ज्योतीबा फुले पुतळयानजीक मा. प्रशासक तथा महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी भारतीय संविधानातील उद्देशिकेचे वाचन केले, त्यापाठोपाठ उपस्थित सर्वांनी सामुहिक वाचन केले. (Pune Municipal Corporation Latest News)

भारतीय संविधानातील उद्देशिकेचे सामुहिक वाचन झाल्यानंतर मा.प्रशासक तथा महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी ध्वजारोहन करुन ध्वजवंदन केले.

या प्रसंगी, मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) विकास ढाकणे, मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ) डॉ.कुणाल खेमनार व सर्व मा.उपआयुक्त , मा.खातेप्रमुख, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.