Pune Municipal Corporation | BLO म्हणून कामकाज करण्यास 73 महापालिका कर्मचाऱ्यांची टाळाटाळ
| जिल्हा प्रशासनाकडून तक्रार
अतिरिक्त आयुक्तांच्या निर्देशानुसार पुणे शहरातील विधानसभा मतदार संघांमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून कामकाज करण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडील सेवकांच्या उप जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे व मतदार नोंदणी अधिकारी / सहा. मतदार नोंदणी अधिकारी संबंधित विधानसभा मतदार संघ यांचेकडून आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. त्यापैकी काही सेवक निवडणूकविषयक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) चे कामामध्ये जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याचे पत्रान्वये महापालिका आयुक्त यांना कळविण्यात आले आहे.
त्यानुसार बरेच कर्मचारी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) चे कामकाज करत नसल्याचे दिसून आले आहे. सदर सेवकांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) कामकाज हे आपल्या पदाचे कामकाजास सांभाळून करावयाचे आहे. 73 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांनी कामकाजामध्ये जाणीवपूर्वक टाळाटाळा केल्याचे सिद्ध झाल्यास “लोक प्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील परि. २९ व लोकप्रतिनिधित्व अधिनियम,
१९५१ मधील परि. १३४” अन्वये कायदेशीर कारवाईस पात्र राहती. असे अतिरिक्त आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. तसेच ही जबाबदारी खाते प्रमुखांनी घ्यावी, असे ही अतिरिक्त आयुक्तांनी म्हटले आहे. (PMC Pune News)