Power Cut In Pune News | महावितरण अधिकाऱ्यांनो कारभार सुधारा अन्यथा नागरिकांसह भव्य मोर्चा काढू
| माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा महावितरण अधिकाऱ्यांना इशारा
Power Cut In Pune News | महावितरणच्या (Mahavitran) कारभाराचे सगळीकडे वाभाडे निघत आहेत. तरी देखील त्यांच्या व्यवस्थापनामध्ये सुधारणा होताना दिसत नाही. गुरुवारी तब्बल आठ तास ऐन उन्हाळ्यात वीज पुरवठा खंडित (Pune Power Cut) करण्यात आला. त्याचा नाहक त्रास नागरिकांना झाला. महावितरणच्या कारभारात सुधारणा न झाल्यास नागरिकांसह भव्य मोर्चा महावितरणच्या कार्यालयावर आयोजित करू, असा इशारा पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे (Former Deputy Mayor Dr Siddharth Dhende) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला. (Power Cut in pune news)
पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या (पीजीसीआयएल) अतिउच्चदाब ४०० केव्ही शिक्रापूर ते तळेगावच्या चारपैकी दोन वीजवाहिन्यांमध्ये गुरूवारी (दि. १८) रात्री ७ वाजून १० मिनिटांनी अचानक तांत्रिक बिघाड झाला. परिणामी चाकण एमआयडीसीसह पुणे शहरातील नगररोड विभाग आणि पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी व भोसरी विभागातील सुमारे ३ लाख ५५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला. सुमारे ३९६ मेगावॅट विजेचा पुरवठा बंद झाल्यामुळे पुणे शहरातील प्रामुख्याने खराडी, वडगावशेरी, विमाननगर, येरवडा, धानोरी आदी परिसरातील सुमारे १ लाख २५ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. (Pune power cut PGCIL)
महावितरणच्या या गलथान कारभाराचा फटका नागरिकांना बसत आहे. प्रभाग क्रमांक दोन मधील महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड, नागपूर चाळ, त्रिदलनगर सह अन्य भागातील नागरिक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. पुण्यात उन्हाचा पारा वाढला आहे. दिवसा बाहेर पडण्यास नागरिक धजावत नाहीत. घरात बसूनही प्रचंड गर्मीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. गर्मीने त्रस्त असताना यामधे महावितरणच्या गलथान कारभाराची भर पडली आहे. (Mahavitran Marathi news)
वास्तविक पाहता देखभाल दुरुस्तीसाठी खासगी ठेकेदार कंत्राटी कर्मचारी नेमून लाखो रुपये खिशात घालत आहेत. देखभाल दुरुस्तीसाठी मोठी रक्कम खर्च होत असेल तर तांत्रिक बिघाड कसा होतो, असा सवाल डॉ. धेंडे यांनी उपस्थित केला. त्यामुळे वीज पुरवठा खंडित होऊन नागरिकांची गैरसोय झाल्यास त्याला सर्वस्वी संबंधित अधिकारी जबाबदार धरावेत. तसेच वीज पुरवठा खंडित करून ही यंत्रणा खासगी उद्योजकांच्या घशात घालण्याचा डाव बंद करा. अन्यथा या गलथान कारभाराचा तीव्र मोर्चा आयोजित करून निषेध करू, असा इशारा डॉ. धेंडे यांनी दिला. (Pune power cut)
—————————
News Title | Reform the administration or else we will take out a grand march with the citizens- Former Deputy Mayor Dr. Siddharth Dhende’s warning to the General Distribution Officers