Ravindra Salegaonkar | शिवाजीनगर परिसरात टाक्यांची मोफत स्वच्छता मोहीम | रविंद्र साळेगावकर यांच्या उपक्रमाचे रहिवाशांकडून कौतुक!

HomeBreaking News

Ravindra Salegaonkar | शिवाजीनगर परिसरात टाक्यांची मोफत स्वच्छता मोहीम | रविंद्र साळेगावकर यांच्या उपक्रमाचे रहिवाशांकडून कौतुक!

Ganesh Kumar Mule Nov 23, 2025 11:52 AM

PM Modi Pune Tour | पंतप्रधान मोदींच्या सभेला महायुतीचे दोन लाख कार्यकर्ते उपस्थित राहतील | प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष राजेश पांडे यांची माहिती 
Pune Congress | भाजपचे संकल्पपत्र म्हणजे ‘फसवानामा’|  मोहन जोशी – पुण्याची निवडणूक पूर्णपणे महाविकास आघाडीच्या हाती – रवींद्र धंगेकर
MLA Sunil Kamble | NCP Pune | आमदार सुनिल कांबळे यांच्या विरोधात शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून पुण्यात आंदोलन

Ravindra Salegaonkar | शिवाजीनगर परिसरात टाक्यांची मोफत स्वच्छता मोहीम | रविंद्र साळेगावकर यांच्या उपक्रमाचे रहिवाशांकडून कौतुक!

 

Shivajinagar Model Colony – (The Karbhari News Service) – भारतीय जनता पक्षाच्या वतीने शिवाजीनगर-मॉडेल कॉलनी परिसरातील सोसायट्यांच्या पाण्याच्या टाक्यांची मोफत स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपचे शहर सरचिटणीस रविंद्र साळेगावकर यांच्या पुढाकाराने मागील चार महिन्यांपासून ही मोहीम सुरू आहे. आतापर्यंत जवळपास १४० सोसायट्यांच्या टाक्यांची स्वच्छता करण्यात आली आहे. (Pune News)

स्वच्छतेदरम्यान टाक्यांमधील कचरा, पालापाचोळा, दगड, माती, शेवाळे काढून संपूर्ण टाकी स्वच्छ केली जाते. त्यानंतर फवारणी करून निर्जंतुकीकरण केले जाते. मोफत सुरू असलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

राजेश बंगला, नकुल अपार्टमेंट, वीर नेताजी सोसायटी, दख्खन पाटबंधारे गृह रचना सोसायटी, अशोक सोसायटी, चंद्रलोक अपार्टमेंट यांसह परिसरातील अनेक सोसायट्या, अपार्टमेंट्स आणि बंगल्यांतील टाक्यांची स्वच्छता करण्यात आली आहे.

पीएमसी कॉलनी, पांडवनगर येथील मयूर शेंडगे म्हणाले, “आमच्या येथील दहा इमारतींच्या पाण्याच्या टाक्या साळेगावकर यांच्या वतीने स्वच्छ करण्यात आल्या. लोकहिताची कामे त्यांच्याकडून नेहमीच केली जातात.”

पीएमसी कॉलनी येथे या स्वच्छता मोहिमेच्या दूसऱ्या टप्प्यातील भूमिपूजन समारंभाचे आयोजन नुकतेच करण्यात आले. आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले. यावेळी आमदार शिरोळे म्हणाले, “स्वच्छ पाणी आणि निरोगी आरोग्य या उद्दिष्टाने राबविण्यात येणारी ही मोफत स्वच्छता मोहीम नागरिकांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरेल आणि हा जनकल्याणकारी उपक्रम आहे.”

आयोजक साळेगावकर म्हणाले, “पावसाळ्यात अनेक टाक्या अस्वच्छ होतात. नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पाणी मिळावे यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे. दिवसेंदिवस सोसायट्यांचा सहभाग वाढत आहे.”

 

 

भूमिपूजनप्रसंगी हेमंत डाबी, किरण ओरसे, सुजीत गोटेकर, पाटोळे, रविराज यादव, अपर्णा कुऱ्हाडे, लता धायगुडे, सीमा उत्तेकर, दत्ता घोगल्लू, ईश्वर बनपट्टे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: