Ravindra Binwade PMC | पुण्यात मुलींच्या जन्माच्या प्रमाणात होत असलेल्या घरसरणीबाबत अतिरिक्त आयुक्तांची असंवेदनशीलता! 

HomeBreaking Newsपुणे

Ravindra Binwade PMC | पुण्यात मुलींच्या जन्माच्या प्रमाणात होत असलेल्या घरसरणीबाबत अतिरिक्त आयुक्तांची असंवेदनशीलता! 

गणेश मुळे Jan 30, 2024 3:25 PM

Public awareness about dengue by Pune Municipal Health Department on the occasion of National Dengue Day
PMC Employees Union | CHS योजनेबाबत पीएमसी एम्प्लॉईज युनियनच्या महापालिका आयुक्तांकडे विविध मागण्या! 
PMC Health Officer | आरोग्य प्रमुखांचा अतिरिक्त पदभार डॉ कल्पना बळिवंत यांच्याकडे!

Ravindra Binwade PMC | पुण्यात मुलींच्या जन्माच्या प्रमाणात होत असलेल्या घरसरणीबाबत अतिरिक्त आयुक्तांची असंवेदनशीलता!

Ravindra Binwade PMC | Pune Sex Ratio | पुणे शहर (Pune City) मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यात मागेच असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. महापालिका आरोग्य विभागाच्या (PMC Health Department) माहितीनुसार पुणे शहरात मुलींचे जन्माचे प्रमाण 2023 साली घटून 890 वर आले आहे. 2020 साली हे प्रमाण 946 होते. मागील काही वर्षात महापालिकेने (Pune Municipal Corporation PMC) चांगले काम करत हे प्रमाण 879 वरून 946 पर्यंत आणले होते. मात्र आता पुणे शहरातील मुलींच्या जन्माच्या प्रमाणात चांगलीच घसरण होत चालली आहे. मात्र हा विभाग ज्यांच्या अधिपत्याखाली येतो ते अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (Pune Municipal Corporation Additional Commissioner Ravindra Binwade) यांनी याबाबत फारच असंवेदनशीलता दाखवून दिली आहे. आपल्याला इतर कामे, बैठका असतात. याबाबत आपल्याला काही माहिती नाही, अशी प्रतिक्रिया अतिरिक्त आयुक्त बिनवडे यांनी दिली आहे. पुणे शहराला असे असंवेदनशील आणि बेजबाबदार अधिकारी हवे आहेत का, असा विचार शहरातील सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि नागरिक यांना यानिमित्ताने यांनी करण्याची वेळ आली आहे. (Pune Sex Ratio)

ही देखील बातमी वाचा : Pune Sex Ratio | सावित्रीबाईंच्या पुण्यात 1 हजार मुलांमागे फक्त 890 मुली! 

2010 साली पुणे शहरातील मुलींच्या जन्माचे प्रमाण 879 होते. 2011 मध्ये मुलींच्या जन्माचे प्रमाण 884 एवढे होते. 2012 व 2013 मध्ये अनुक्रमे 934 व 933 एवढे प्रमाण होते. 2014 मध्ये त्यात थोडीशी वाढ होऊन ते 937 पर्यंत गेले, तर 2015 मध्ये  हे प्रमाण घसरून 925 पर्यंत खाली आले होते. त्यानंतर 2019 ला 922 तर 2020 ला हे प्रमाण 946 पर्यंत आले होते. मात्र 2021 मध्ये यात खूपच घसरण झाली. 1000 मुलांच्या मागे मुलींचे प्रमाण फक्त 900 असे होते. तर 2022 साली यात थोडीशी सुधारणा होऊन हे प्रमाण 910 इतके झाले. त्यानंतर आता 2023 सालात देखील संख्या कमीच असल्याचे दिसून येत आहे.  910 वरून हे प्रमाण 890 इतके असल्याचे दिसून आले आहे. (Pune Municipal Corporation Health Department)

हे पूर्णपणे पुणे महापालिका आरोग्य विभागाचे अपयश आहे, असे मानले जात आहे. महापालिका जनजागृती करण्यात आणि लिंग तपासणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करण्यात कमी पडली असल्याचे दिसून येत आहे. याबाबत महापालिका काही नियोजन करणार आहे का, याबाबत अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांना विचारले असता त्यांनी खूप आश्चर्यकारक उत्तर दिले. बिनवडे म्हणाले कि मला इतर कामे, बैठका असतात. मला याबाबत काही माहिती नाही. अशा पद्धतीच्या अससंवेदनशील आणि बेजबाबदारपणा बाबत शहरातील सामाजिक संघटना, राजकीय पक्ष जाब विचारणार का, शिवाय महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar IAS) याबाबत काही कारवाई करणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.