महापालिका अधिकारी/सेवकाना रॅपिड कोरोना चाचणी अनिवार्य
| आरोग्य विभागाचे सर्व विभागांना आदेश
आरोग्य अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार कोरोना १९ चा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता जिल्हाधिकारी पुणे यांचे कार्यालयात सचिव केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, नवी दिल्ली यांचे समावेत व्हिडीओ कॉन्फरन्स बैठक बुधवार दिनांक २० जुलै २०२२ रोजी संपन्न झाली. बैठकीस महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका हे उपस्थित होते. सदर बैठकीत सचिव केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, नवी दिल्ली यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांची कोरोना १९बाबत रॅपिड चाचणी करणे अनिवार्य आहे. त्यासाठी आपल्या विभागाकडून कोरोना १९बाबत रॅपिड चाचणी करणेसाठी टेक्निशिअनचे पथक नियुक्ती करण्यात यावे व पुढील ३ दिवसांमध्ये उप आयुक्त (परिमंडळ १ ते ५) व सर्व महापालिका सहाय्यक आयुक्त (१ ते १५) कार्यालयांकडील सर्व अधिकारी/सेवक यांची कोरोना रॅपिड चाचणी करणेबाबत महापालिका आयुक्त यांनी आदेश दिलेले आहेत. तरी आपल्या विभागाकडील सर्व अधिकारी / सेवक यांची कोरोना रॅपिड चाचणीकरून घेण्यात येऊन तसा अहवाल आरोग्य अधिकारी यांचेकडे सादर करावा. असे आदेशात म्हटले आहे.