Dr. Ramesh Shelar PMC | मालमत्ता विवरण पत्राच्या आदेशातील  संदर्भानुसार न्याय देण्याची डॉ रमेश शेलार यांची मागणी

HomeपुणेBreaking News

Dr. Ramesh Shelar PMC | मालमत्ता विवरण पत्राच्या आदेशातील संदर्भानुसार न्याय देण्याची डॉ रमेश शेलार यांची मागणी

गणेश मुळे May 06, 2024 4:54 PM

 Action by Pune Municipal Corporations (PMC) building devlopment Department in Pashan area
PMC Hawker’s Policy | 9852 पथारी व्यावसायीकांनी महापालिकेचे 56 कोटी भाडे थकविले
PMC Employees Ganeshotsav | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या गणेशोत्सव मंडळाचे यंदा ५१ वे वर्ष | अतिरिक्त आयुक्त यांच्या हस्ते श्रीं ची प्रतिष्ठापना

Dr. Ramesh Shelar PMC | मालमत्ता विवरण पत्राच्या आदेशातील  संदर्भानुसार न्याय देण्याची डॉ रमेश शेलार यांची मागणी

| डॉ शेलार यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

Pune Municipal Corporation (PMC) – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेकडील वर्ग 1 ते वर्ग 3 मधील अधिकारी/ कर्मचारी मालमत्ता दायित्व विवरणपत्र सादर करणेबाबत  अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) यांनी आदेश जारी केले आहेत. त्यातील संदर्भानुसार योग्य ती चौकशी करून न्याय देण्याची मागणी प्रभारी पर्यावरण अधिकारी डॉ रमेश शेलार यांनी महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे. (Pune PMC News)

डॉ शेलार यांच्या पत्रानुसार मालमत्ता विवरणपत्र सादर करण्याचे आदेश नुकतेच अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) यांनी पारित केलेला आहे. या आदेशातील संदर्भ क्र २ कार्यालयीन आदेशान्वये वर्ग ०१ ते वर्ग ०३ चे अधिकारी / कर्मचारी मालमत्ता दायित्व विवरणपत्र विहित नमुन्यात सादर करणेबाबत आदेशित करण्यात आले आहे. त्यानुसार मी  डॉ. रमेश शेलार मुख्य सुरक्षा अधिकारी तथा पर्यावरण व्यवस्थापक
(अधिकारी) घनकचरा व्यवस्थापन विभाग, माझे मालमत्ता दायित्व विवरणपत्र. १. प्रथम नियुक्तीच्या वेळी सादर करावयाचे विवरणपत्र यामध्ये नमूद केलेप्रमाणे सादर केले आहे. परंतु सन २००९ कार्यालयीन आदेश मालमत्ता विवरणपत्र प्रथम भरलेले आहे.
माझेकडील असलेले अतिक्रमण, घरपाडी व आकाश चिन्ह दर २२२ चौरस फुट अंमलबजावणी यावरून नाराजी असलेल्या व्यक्तीने खोट्या तक्रारी करून माझी मालमत्ता विवरण पत्रातील लुटीची विभागीय चौकशी प्रस्तावित करून याच तक्रारी लाचलुचपत विभागाकडे केलेल्या आहेत. विभागीय चौकशी सुरु असताना माझे घर झडती झाली.  त्या चौकशीस सुद्धा मी आजतगायपर्यंत सामोरे जात आहे. पारित झालेल्या आदेशातील संदर्भ कर. १ नुसार शासन निर्णय झालेल्या असताना त्यांचे उल्लंघन करून चौकशी अधिकारी यांनी अहवाल ठेवून शासन निर्णय अवहेलना केलेली आहे. या बाबीचा विचार न होता कठोर शिक्षा देवून मला सेवेत पुनर्स्थापित केले. तदनंतर दोन महिनेनंतर माझी अवहेलना करणेसाठी कमी दर्जेचा पदावर (अकार्यकारी) कामकाज करणेसाठी आदेश दिला आहे. त्यानुसार काम पाहत आहे. माझेवरती झालेल्या अन्यायाबाबत मी वारंवार विनंती अर्ज करून न्याय मागितलेला आहे. माझे अर्जाचा विचार न झालेमुळे अन्याय झालेला आहे.
डॉ शेलार यांनी पुढे म्हटले आहे कि, माझे शिक्षण Ph.D, ME. (Civil Environment) LL.M. झालेले आहे. पुणे महानगरपालिकेत मी कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), मुख्य सुरक्षा अधिकारी, त्याचं बरोबर उप आयुक्त (अतिक्रमण), विशेष कार्याधिकारी (आकाश चिन्ह) प्र. मुख्य विधी अधिकारी, प्र. नगरसचिव, या पदवरती काम पहिले आहे.
वास्तविक विभागीय चौकशी व त्या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेत मला मुख्य विधी सल्लागार, नगरसचिव, मुख्य कामगार अधिकारी या पदासाठी पत्र असतान नाकारण्यात आले आहे. मे मार्च २००९ पासून खातेप्रमुख म्हणून कार्यरत आहे. तरीसुद्धा मला “सह महापालिका आयुक्त” या पदाचे फायदे मिळाले नाहीत व पदोन्नतीने अतिरिक्त आयुक्त पदासाठी देखील माझे नाव डावलण्यात आले आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशातील संदर्भानुसार योग्य तीचौकशी करून न्याय द्यावा. अशी मागणी डॉ शेलार यांनी महापलिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.