PMC Ramesh Shelar News | अकार्यकारी ऐवजी कार्यकारी पद देण्याची रमेश शेलार यांची मागणी    – अकार्यकारी पद देताना प्रशासनाने चुकीचा संदर्भ दिल्याचे आणले निदर्शनास

HomeBreaking Newsपुणे

PMC Ramesh Shelar News | अकार्यकारी ऐवजी कार्यकारी पद देण्याची रमेश शेलार यांची मागणी – अकार्यकारी पद देताना प्रशासनाने चुकीचा संदर्भ दिल्याचे आणले निदर्शनास

कारभारी वृत्तसेवा Nov 07, 2023 4:32 PM

Pune Rain | Tree Fall | शहरात परवाच्या पाऊसाने शंभरहून अधिक ठिकाणी झाडपडीच्या घटना
Sugar factory Employees | साखर कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत सहकार मंत्री यांच्यासोबत बैठक
Vande Bharat Express | वंदे भारत एक्स्प्रेसला दौंड येथे थांबा द्यावा | खासदार सुप्रिया सुळे यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

Ramesh Shelar News | अकार्यकारी ऐवजी कार्यकारी पद देण्याची रमेश शेलार यांची मागणी

– अकार्यकारी पद देताना प्रशासनाने चुकीचा संदर्भ दिल्याचे आणले निदर्शनास

Ramesh Shelar News | पुणे | पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागात (PMC Solid Waste Management Department) रमेश शेलार (Ramesh Shelar) हे पर्यावरण व्यवस्थापक (अकार्यकारी) म्हणून काम पाहत आहेत. मात्र असे पद देताना प्रशासनाने चुकीचा संदर्भ दिला आहे, असे शेलार यांनी प्रशासनास निदर्शनास आणून दिले आहे. तसेच दोन महिने कार्यकारी पद देऊन पुन्हा अकार्यकारी पद प्रशासनाने दिले, हे माझ्यावरच्या आकसापोटी केले असल्याचा आरोप देखील शेलार यांनी केला आहे. तसेच आता तरी प्रशासनाने आपली चूक सुधारून कार्यकारी पद द्यावे, अशी मागणी शेलार यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. (Pune Municipal Corporation)

रमेश शेलार यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे कि, २४/१०/२०१९ रोजीच्या  “ अकार्यकारी” आदेशांप्रमाणे मी कामकाज करत आहे. परंतु महापालिकेने निर्गमित केलेल्या आज्ञापत्रकामध्ये नमूद महाराष्ट्र शासन आदेशाचा १४/११/२०११ हा चुकीचा आहे. हे नम्रपणे आपले निदर्शनास आणीत आहे. पुढे  महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका यांनी सुध्दा ०४/०९/२०२० रोजी पारित केलेल्या कार्यालयीन आदेशामध्ये शासन आदेशाचा.१४/११/२०११ हा चुकीचा नमूद केलेला आहे. (PMC Pune News)

अशाच प्रकारचे साध्यर्म केस असलेले मानीव निलंबन सदरात असणारे वर्ग १ चे अधिकारी हे कार्यकारी पदाचे कामकाज करत आहे. माझे प्रकरण मानीव निलंबन या सदरात येत नाही, तरीही मी मात्र “अकार्यकारी ” पदावर काम करत आहे, न्यायालयीन प्रक्रिया ही माझे हाता बाहेरील आहे. तरी माझेवरील अन्याय दूर होणेस व मला अकार्यकारी पदा ऐवजी कार्यकारी पदी काम करणेस संधी मिळावी. असे शेलार यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.