Ram Mandir Celebration | श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना दिनानिमित्त २२ जानेवारीला दरवर्षी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा     | श्रीनाथ भिमाले यांची नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी 

HomeBreaking Newsपुणे

Ram Mandir Celebration | श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना दिनानिमित्त २२ जानेवारीला दरवर्षी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा  | श्रीनाथ भिमाले यांची नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी 

गणेश मुळे Jan 11, 2024 1:43 PM

BJP vs NCP | राष्ट्रवादी काँग्रेसच्या पायाखालची वाळू घसरली | भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची टीका
Pune Municipal Corporation | पुणे महापालिकेच्या ड्रेनेजच्या कामाबद्दल भाजपकडून भांडारकर रोडवर धरणे आंदोलन
Chandrashekhar Bawankule Vs Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांना मत म्हणजे हिंदू सनातन धर्म संपवण्याची वल्गना करणाऱ्यांना मत | भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

Ram Mandir Celebration | श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना दिनानिमित्त २२ जानेवारीला दरवर्षी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा

| श्रीनाथ भिमाले यांची नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी

Ram Mandir Celebration | आयोध्येमधील श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना (Ayodhya Ram Mandir Inauguration) दिनानिमित्त २२ जानेवारी २०२४ हा दिवस राष्ट्रीय सण घोषित करून दरवर्षी सार्वजनिक सुट्टी (Public Holiday) जाहीर करण्याची विनंती पुणे महापालिकेचे माजी सभागृह नेते तथा भाजपचे पुणे लोकसभेचे समन्वयक श्रीनाथ यशवंत भिमाले (Shrinath Bhimale Pune)  यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे केली आहे. (Ram Mandir Celebration)

याबाबत भिमाले यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. त्यानुसार आपल्या भारत देशातील सर्व नागरिकांकरिता एक आनंदाची बातमी म्हणजेच आयोध्येमध्ये प्रदीर्घ कालावधीनंतर भगवान श्री राम विराजमान होणार आहेत. याकरिता प्रत्येक भारतीय अगदी मनापासून आतुर झालेला आहे. आपण सर्वजण अयोध्येच्या श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या शुभ प्रसंगाजवळ येत आहोत. २२ जानेवारी २०२४ रोजी सुमारे ५०० वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर संपूर्ण भारत देशात आनंद उत्सवाचे वातावरण निर्माण होणार आहे. जसे काही दिवाळी सारखाच प्रत्येक भारतीय हा सन साजरा करणार आहे. त्यामुळे २२ जानेवारी २०२४ रोजी राष्ट्रीय सन घोषित करून दरवर्षी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याचा विचार करावा.

 सार्वजनिक सुट्टी घोषित केल्याने नागरिकांमध्ये नक्कीच आनंदाचे वातावरण निर्माण होऊन सर्व नागरिक श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना दिनानिमित्त साजरे केल्या जाणाऱ्या ऐतिहासिक उत्सवात सहभागी होण्याची संधी त्यांना मिळणार आहे. त्यामुळे आमच्या विनंतीचा विचार करण्यात यावा, असे भिमाले यांनी पत्रात म्हटले आहे.