राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ममता फाउंडेशनमध्ये रक्षाबंधन साजरा
पुणे: कात्रज येथील ममता फाउंडेशनमधील एचआयव्ही बाधित अनाथ निराधार मुलांनी रक्षाबंधनाचा आनंद घेतला. संस्थेतील मुलींनी स्वतः बनविलेल्या राख्या बांधून सण साजरा केला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कोथरूड विधानसभा अध्यक्ष गिरीश गुरनानी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम पार पडला.
गिरीश गुरनानी म्हणाले, ‘आई-वडिलांच्या कुशीत खरे बालपण असते, परंतु कित्येक बालकांच्या नशिबी असे बालपण येतच नाही. ममता फाउंडेशनमधील अशा अनाथ निराधार मुलांनी स्वतः बनविलेल्या राख्या आणि त्याचे बॉक्स खूप आकर्षक होते. राखी बांधताना मुलींच्या चेहऱ्यावरील आनंद मनाला समाधान देणारा होता.
समाजात जनजागृती निर्माण करणे आणि सामाजिक उपक्रमातून मदत करणे हा हेतू या उपक्रमाचा होता.या उपक्रमाच्या माध्यमातून वेगळाच आनंद आणि समाधान मिळाले.’
यावेळी अमोल गायकवाड ,मिलिंद शिंदे, विशाल विचारे, सागर पळे, मंगेश भोंडवे, संतोष सोनावणे आदी उपस्थित होते.