Raj Thackeray on Pune Flood | पुण्यातील पूर परिस्थितीत महापालिका कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे राज ठाकरे यांच्याकडून कौतुक |अधिकारी आणि कर्मचारी यांचे निलंबन योग्य नसल्याचे व्यक्त केले मत 

HomeBreaking Newsपुणे

Raj Thackeray on Pune Flood | पुण्यातील पूर परिस्थितीत महापालिका कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे राज ठाकरे यांच्याकडून कौतुक |अधिकारी आणि कर्मचारी यांचे निलंबन योग्य नसल्याचे व्यक्त केले मत 

गणेश मुळे Aug 03, 2024 1:09 PM

Chief Minister explanation | मंत्रीस्तरावरील कोणतेही अधिकार सचिवांना नाहीत | मुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण 
Seva fortnight | राज्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर कालावधीत ‘सेवा पंधरवडा’ | नागरिकांचे प्रलंबित अर्ज निकाली काढावेत; मुख्यमंत्र्यांचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
Vedanta Foxconn Project | खुर्चीत बसले की मुख्यमंत्री होत नाही, त्यासाठी जबाबदारी स्विकारावी लागते | खासदार सुप्रिया सुळे यांचा टोला

Raj Thackeray on Pune Flood | पुण्यातील पूर परिस्थितीत महापालिका कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे राज ठाकरे यांच्याकडून कौतुक |अधिकारी आणि कर्मचारी यांचे निलंबन योग्य नसल्याचे व्यक्त केले मत

|पूरग्रस्तांना त्वरित मदत करण्याची मुख्यमंत्री यांच्याकडे केली मागणी

 

Raj Thackeray on Pune Flood – (The Karbhari News Service) – पुणे शहरातील पूर परिस्थिती असलेल्या भागांना मनसे अध्यक्ष  राजसाहेब ठाकरे यांनी भेट देत तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच याबाबत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत पूर परिस्थितीची पूर्वसूचना देणाऱ्या प्रभावी यंत्रणा कार्यान्वित करणे व पूरग्रस्तांना तत्काळ देणे गरजेचं आहे, अशी मागणी केली. तसेच राज ठाकरे यांनी पूर परिस्थितीत महापालिका कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे  कौतुक केले. शिवाय ज्या अधिकारी आणि कर्मचारी यांना याला जबाबदार धरत निलंबन करण्यात आले आहे, ते योग्य नसल्याचे मत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात व्यक्त केले आहे.

शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीकाठी राहणाऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेले काही दिवस नदीपात्रात सातत्याने पाण्याचा विसर्ग मोठ्यप्रमाणावर होत आहे. त्यामूळे शहराच्या अनेक भागात पूर परिस्थिती आहे या पुरबाधित क्षेत्रातील नागरिकांना आवश्यक त्या सुविधा पुरवणे अत्यंत गरजेचे आहे . या भागात स्वच्छता करण्यासोबतच नागरिकांना अन्न, स्वच्छ पाणी देण्याची यंत्रणा अधिक सक्षमपणे कार्यान्वित करावी लागणार आहे.या परिसरातील वीज पुरवठा सुरळित करण्यासाठी आणि पूर परिस्थिती निर्माण होण्या पूर्वी तो पुरवठा खंडित करण्या साठी यंत्रणा कार्यान्वित करणे गरजेचे आहे . या भागीतल रहिवासी संकुला च्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या गाळ मोठ्यप्रमाणावर गेल्या मुळे खराब झाल्या आहेत त्या स्वच्छ करून देण्याची जबाबदारी प्रशासनाने घेतली पाहिजे जेणे करून या भागात साथीचे रोग पसरणार नाही. अनेक घरात अन्नधान्य खराब झाले आहे आपत्तीच्या या काळात अशा नागरीकांना मोफत धान्य वितरणाची सोय प्रशासनाने त्वरित करावी. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य मोठ्यप्रमाणावर खराब झाले असल्याने lपूरग्रस्त भागात दाखले, पुस्तके, वह्या उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात यावी. अशा मागण्या ठाकरे यांनी केल्या आहेत.

ठाकरे यांनी म्हटले आहे कि, मनपा कर्मचारी अधिकारी पूरग्रस्त भागात चागलं काम करीत आहे. यात आणखीन भर टाकत महापालिकेने बाधित क्षेत्रात पूर्ण वेळ मदत कक्ष सुरू ठेवावा. जेणे करून एखादी आपत्ती आल्यास त्वरित मदत देणे शक्य होईल. आता मदतीची कार्यवाही तत्काळ होणे गरजेचे आहे. बाधित ठिकाणचा चिखल बऱ्यापैकी हलवण्यात आला आहे परंतू स्वच्छता पूर्णपणे झाली आहे असे नाही, त्या मुळे अधिकचे मनुष्यबळ नियुक्त करीत चांगली सफाई करण्यात यावी. याकामी नियुक्त करण्यात येणाऱ्या कर्मचारी व अधिकारी यांच्या आरोग्याची योग्य ती काळजी ही प्रशासनाने घ्यावी. नागरिकांना स्वच्छ पाणी मिळण्यासाठी गरज असेल तर टँकरची व्यवस्था करणे गरजेचं आहे, पुराच्या पाण्यामुळे या भागातील अनेक दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचेही पंचनामे करून नुकसान भरपाईची प्रक्रिया राबवण्यात यावी .

धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्याकरीता विसर्ग करण्यापूर्वी नागरिकांना पूर्वसूचना देणे गरजेचे आहे. जलसंपदा विभाग, महसूल, महानगरपालिका, पोलीस प्रशासन यांनी समन्वयाने यासाठी आवश्यक यंत्रणा का्यान्वित करणे गरजेचे आहे नुसते मोबाईल वर संदेश देऊन भागणार नाही, शहरात पूर्वी धोक्याची सूचना देणारे भोगे वाजविण्यात येत असत. स्मार्ट सिटीच्या माध्यमातुन शहराच्या विविध भागात अनेक स्मार्ट एल ए डी बोर्ड बसवण्यात आले आहे यात भोग्याची यंत्रणा आहे. असे त्या वेळी सांगितले होते त्या यंत्रणेचा वापर धोक्याची सूचना देण्या साठी करण्यात यावा.

सिंहगड रस्ता बरोबरच शहरातील नदीकाठच्या अनेक भागांना पुराचा तडाखा बसला आहे.त्यात पाटील इस्टेट या ठिकाणी नदीकाठच्या घरांचे नुकसान खुप झाले आहे.कोरेगाव पार्क भाग पुलाची वाडी, एरंडवणे चा काही भाग, मुंढवा चा काही भाग वडगाव शेरी या भागातील नदीपात्रा लगतच्या भागांना देखील पुराचा तडाखा बसला आहे. येथील बाधित नागरिकांचे पंचनामे लवकर पूर्ण करने देखील गरजेचं आहे. नागरिकांचे दाखले, कागदपत्रे लवकर देण्याची कार्यवाही होण गरजेचं आहे . पुलाच्या वाडीत मृत्यू मुखी पडलेल्या युवकाच्या घरच्यांना त्वरित शासकीय मदत मिळणे गरजेचे आहे.

शहरातील पूर परिस्थितीला खरेतर पाटबंधारे विभागच जबाबदार आहे. कारण योग्य त्या पूर्व सूचना न देता पाणी सोडण्यात आले, असे असताना व  पुरा नंतर ज्या वेळी सदर भागात भेट घेतली असता मनपा उपायुक्त माधव जगताप आणि त्याची सर्व टीम योग्य ते काम करत असल्याचं दिसले. आणि नागरिकाचा रोष पाटबंधारे वर होता. असे असताना शहरात निर्माण झालेल्या पुरस्थितीला जबाबदार धरत सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे तसेच बऱ्याच कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. हा प्रकार देखील योग्य नाही हे निलंबन मागे घेण्याची मागणीसाठी महापालिका कर्मचाऱ्यांनी महापालिकेत काळ्या फिती लावून आंदोलन केले. अशा काळात या पद्धतीच्या कारवाई या प्रशासनाच्या मनोबला वर विपरीत परिणाम करतात याचा ही विचार प्रशासनाने करणे गरजेचे आहे.

शहरात निर्माण झालेल्या पूर परिस्थिती ची जबाबदारी फक्त पाटबंधारे खात्यावर ढकलुन चालणार नाही. नदीपात्रात झालेली बेकायदेशीर बांधकामे हा मनपा प्रशासनाचा हलगर्जीपणा आहे.आणि ज्यांनी नदीपात्रात राडारोडा केला आहे त्यांना राडारोडा काढायला न लावता त्याचा राडारोडा मनपा पुणेकरांच्या पैश्यात साफ करत आहे हे चुकीचं आहे. या सर्व गुन्हेगार मंडळी वर कडक कारवाई करण्याची गरज आहे. याच वेळी शहरातील ओढ्या वर देखील मोठ्यप्रमाणावर अतिक्रमण झालेली आहे.जर मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी सारखा पाऊस झाला जो होऊ शकतो तर मोठी हानी होऊ शकते,याबाबत मनपा ने आत्ता पासूनच कार्यवाही करत योग्य त्या उपाय योजना करणे गरजेचं आहे. अस ठाकरे यांनी म्हटले आहे.

या केल्या आहेत मागण्या

१.  नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होत आहे याच्या माध्यमातून नदीपात्रात रहिवासी भूखंड निर्माण केले जात आहे.नदी पात्रा लगतचा सुमारे 5 हजार एकरचा हरित पट्टा रहिवासी झोन म्हणून रुपांतरीत करण्याचा प्रयत्न गेली काही वर्ष होत आहे याला मनसे ने विरोध ही केला होता.या बाबत योग्य ती चौकशी करण्यात यावी.
२.  पात्राच्या दोन्ही काठावर ब्लू लाईनच्या आता मनपा मान्यतेने रहिवासी संकुल निर्माण करण्यात आली तिथे आता पाणी शिरत आहे याला शासन जबाबदार आहे,यात सर्व सामान्य जनता भरडली जात आहे.
३.  कोणत्याही नदी च्या दोन पूर रेषा असतात रेड लाईन आणि ब्लू लाईन पुणे महानगर पालिका हद्दीत बांधकाम व्यावसायिकाच्या साठी या पूर रेषा बदलण्याचा पराक्रम झाला आहे याची ही चौकशी झाली पाहिजे
४.  साधरण पणें दोन दशका पूर्वी नदीचं अत्यंत चुकीच्या पद्धतीने चॅनलिंग करण्यात आले आहे त्या मुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह वळवल्या गेला
५. नदीपात्रातील रस्त्या साठी नदीत मोठ्या प्रमाणावर राडारोडा टाकण्यात आला व सीमा भिंत बांधणे सारखे प्रकार झाले.
६.  नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर मेट्रो चा राडारोडा आहे मोट्रो साठी उभारण्यात आलेले पुल व इतर बांधकाम हे पूर परिस्थिती निर्माण करणारे आहे.
७. या नदीपात्रात येऊन मिळणारे अनेक ओढे नाले प्रवाह हे मनपा प्रशासन आणि बिल्डर लॉबी च्या अभद्र युती मुळे बुझवले गेले आहे मोठा पाऊस झाला तर शहराला याचा मोठा फटाका बसून पुण्यनगरी पूर नगरी होणार हे नक्की.
८. खडकवासला धरणाच्या नंतर जिथून नदी प्रवाहित होते या भागात निसर्गाचा चमत्कार असणारे रांजणखळगे आहेत ते देखील जपण्या साठी प्रयत्न होणे गरजेच आहे.
९. पूरग्रस्त भागाचे पंचनामे झाले आहेत परंतु शासनाची मदत मिळणे करता पूरग्रस्त घरात दोन दिवस पाणी राहणे गरजेचे आहे असा नियम आहे सदर नियमाचा अडथळा पुणे शहरातील पूरग्रस्तांना मदत देते वेळी होऊ शकतो तरी  योग्य त्या सूचना देण्यात याव्या.
१०. सदर पंचनाम्या नुसार साधरण पने ८ कोटी रुपयाची तरतूद शासनास करावी लागेल.
११.  पूरग्रस्त भागातील नागरिकाच्या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे त्यांना विमा कंपन्या वेठीस धरत आहे या बाबत जिल्हाधिकारी पुणे यांच्या कडून योग्य त्या सूचना संबंधित विमा कंपन्यांना देण्यात याव्या.