Heavy Rain in Pune | पुण्यात पाऊसाचा हाहाकार | अग्निशमन दलाने वाचवले 12 लोकांचे प्राण!

HomeपुणेBreaking News

Heavy Rain in Pune | पुण्यात पाऊसाचा हाहाकार | अग्निशमन दलाने वाचवले 12 लोकांचे प्राण!

Ganesh Kumar Mule Oct 18, 2022 2:45 AM

Farmers affected by heavy rains | अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ देणार | योजनेतील जाचक अटी काढणार
Yerwada, Kalas, Dhanori : MLA Sunil Tingre : पुराचे पाणी शिरु नये यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजनांवर अमल करावा : आमदार सुनिल टिंगरे यांचे निर्देश
Cabinet Decision | कालपर्यंत झालेल्या पावसाचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करा | राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

पुण्यात पाऊसाचा हाहाकार | अग्निशमन दलाने वाचवले 12 लोकांचे प्राण!

पुणे – काल दिनांक १७•१०•२०२२ रोजी राञी शहर परिसरात मुसळधार पाऊस झाला असता विविध ठिकाणी पाणी शिरल्याच्या व इतर घटना अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात नोंद झाल्या असून अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यात अडकलेल्या एकुण १२ जणांची सुखरुप सुटका करुन आपले कर्तव्य चोख बजावले आहे.

अग्निशमन दलाकडे दिनांक १७•१०•२०२२ रोजी राञी ०९•५७ वाजेपासून विविध प्रकारच्या वर्द्या प्राप्त झाल्या होत्या. यामधे दिनांक १८•१०•२०२२ रोजी पहाटे ०४•०० वाजेपर्यंत पाणी शिरणे किंवा जमा होणे याच्या एकुण २० (येवलेवाडी स्मशानभूमीजवळ – सुखसागर नगर, अंबामाता मंदिर – कोंढवा खुर्द, एनआयबीएम रोड – रास्ता पेठ, दारुवाला पुलाजवळ – सुखसागर नगर, डॉल्फिन चौक – बी टी कवडे रोड अग्निशमन केंद्र समोर – हडपसर, गाडीतळ – शिवाजीनगर पोलिस मुख्यालय – मंगळवार पेठ, शिवाजी स्टेडियम – कसबा पेठ, फिश मार्केट जवळ – कुंभार वाडा समोर – नारायण पेठ, मोदी गणपती – औंध, डिएव्ही स्कुल गल्ली – कसबा पेठ, पवळे चौक – कसबा पेठ, भुतडा निवास – पर्वती, मिञमंडळ चौक – गंज पेठ – भवानी पेठ तसेच ०१ ठिकाणी  सीमा भिंतीचा भाग पडल्याची घटना पर्वती, रमणा गणपतीजवळ घडली. तसेच झाडपडी ०३ ठिकाणी ज्यामधे हडपसर, आकाशवाणी जवळ रस्त्यावर तर चंदननगर, बिडी कामगार वसाहत येथे रिक्षावर झाड पडले आणि पाषाण, लोयला स्कुल येथे दुचाकीवर झाड पडले होते. यामधे दलाची मदत पोहोचण्यापुर्वी जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला नागरिकांनी दवाखान्यात रवाना केले होते.

विषेश म्हणजे मंगळवार पेठ, स्वरुपवर्धिनी जवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने एक कुटूंब पाण्यात अडकले होते. तेथील स्थानिक पल्लवी जावळे यांनी मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांना कळविताच तिथे अग्निशमन अधिकारी प्रदीप खेडेकर, तांडेल राजाराम केदारी, अनिल करडे व जवान छगन मोरे, शफीक सय्यद, हरिश बुंदेले, राजू जगदाळे, निलेश कर्णे, महेश गरड, मयुर कारले, चंद्रकांत मेनसे, राहुल जाधव, नवनाथ जावळे व चालक धीरज सोनावणे यांनी तेथील ०३ लहान मुली ०१ महिला व ०१ पुरूष (एकुण ०५) यांना सुखरुप बाहेर आणले. यामधे तांडेल राजाराम केदारी यांनी लहान मुलींना खांद्यावर घेऊन येताच स्थानिकांनी त्यांचे आभार मानले व याचा विडीओ सोशल मिडियावर बराच प्रसिद्ध झाला.

कोंढवा खुर्द भाजी मंडई लगत एका ठिकाणी ०७ नागरिक पाण्यामधे अडकले होते. या सर्व ०७ सुखरुप बाहेर काढण्यासाठी रश्शीचा वापर करून पाण्यामधे जात कोंढवा खुर्द अग्निशमन जवान निलेश लोणकर, रवि बारटक्के, नारायण मिसाळ, सुरज माळवदकर, सागर इंगळे, अनिकेत गोगावले व चालक दिपक कचरे यांनी ही उत्तम कामगिरी केली.