Rain in Dhanori | महापालिका आयुक्तांकडून धानोरी भागातील नाले आणि पावसाळी लाईनची पाहणी!

HomeपुणेBreaking News

Rain in Dhanori | महापालिका आयुक्तांकडून धानोरी भागातील नाले आणि पावसाळी लाईनची पाहणी!

गणेश मुळे Jun 07, 2024 12:59 PM

PMC Employees Union Annual Report | पी .एम.सी एम्प्लॉईज युनियनच्या वार्षिक अहवालचे प्रकाशन! 
Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महानगरपालिकेला राष्ट्रपती यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान!
 Pune PMC Commissioner | माहिती अधिकार दिनात पूरस्थिती बाबतचा समिती अहवाल दाखवला पण प्रत द्यायला मात्र महापालिका आयुक्तांचा नकार | विवेक वेलणकर

Rain in Dhanori | महापालिका आयुक्तांकडून धानोरी भागातील नाले आणि पावसाळी लाईनची पाहणी!

Rain In Dhanori, Kalas  – (The Karbhari News Service) – धानोरी आणि कळस परिसरात गेल्या आठवड्यात ढगफुटी सदृष्य पाऊस झाला होता. त्या अनुषंगाने  महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS) यांनी कळस, धानोरी भागातील नाल्यांची व पावसाळी लाईनची पाहणी केली. पाहणीमध्ये कळस येथील ग्रेप सेंटर मधून येणाऱ्या नाल्यावरील कल्वर्टची पाहणी केली. नाल्याचे खोलीकरण करणे व कल्वर्ट साफ करनेच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. (Pune Municipal Corporation (PMC)
धानोरी रस्त्यावरील लक्ष्मी पार्क येथे लष्कराचे शूटिंग रेंज परिसरातून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी, माती, राडारोडा वाहून आला होता.  त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात जुनी घरे आहेत व नाल्याचे पात्र अरुंद आहे. त्या ठिकाणाचे तातडीने रस्त्यावरील राडारोडा हटवून, पावसाळी लाईन साफ करणेत आली व ज्यादा लाईन जोडून, लोखंडी पावसाळी जाळ्या टाकनेचे काम हाती घेणेत आले आहे. (Pune PMC News)
लष्कराचे अधिकारी यांचेशी बोलून त्याचे हद्दीतील पावसाचे पाण्याचे नियोजन करणेच्या सूचना संबंधित अधिकारी यांना. महापालिका आयुक्त यांनी दिल्या. गंगा अरिया या सोसायटी जवळील नाल्याची भित पावसाचे पाण्याचे प्रेशर मूळे ढासळली.  त्याची पाहणी बांधकाम विभागाचे अधिकारी यांचे सोबत आयुक्त यांनी केली, त्यावेळी सोसायटी मधील नागरिक यांनी त्याच्या अडचणी मांडल्या. त्याबाबत संबंधित अधिकारी यांना आवश्यक कार्यवाही करणेबाबत सूचना त्यांनी केल्या.
या ठिकाणांच्या पाहणीसाठी महापालिका आयुक्त यांचे समवेत मा. पृथ्वीराज बी.पी. अति महा आयुक्त ( ई ), अनिरुद्ध पावसकर मुख्य अभियंता – पथ विभाग, उपायुक्त संदीप कदम, किशोरी शिंदे, गव्हाणे कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग, दिनकर गोजारे अधीक्षक अभियंता, मलनिःसारण देखभाल – दुरुस्ती, व इतर म.न.पा अधिकारी उपस्थित होते.