Question Hour in PMC GB | चालू पंचवार्षिक मध्ये तरी प्रश्नोत्तराचा तास होणार का? | माजी महापौर संघटनेचा महापौरांना सवाल 

HomeBreaking News

Question Hour in PMC GB | चालू पंचवार्षिक मध्ये तरी प्रश्नोत्तराचा तास होणार का? | माजी महापौर संघटनेचा महापौरांना सवाल 

Ganesh Kumar Mule Feb 12, 2026 7:39 PM

Hemant Rasne Vs Ankush Kakade : शेवटी हेमंत रासने यांची हौस फिटली  : राष्ट्रवादी प्रवक्ते अंकुश काकडे यांचा टोला 
Ankush Kakade Vs Girish Bapat : बापटांनी मोहोळांच्या घरात किती दाबाने पाणी येते ते पाहावे आणि जनतेला सांगावे 
Hemant Rasne Vs Ankush Kakade : शेवटी हेमंत रासने यांची हौस फिटली  : राष्ट्रवादी प्रवक्ते अंकुश काकडे यांचा टोला 

Question Hour in PMC GB | चालू पंचवार्षिक मध्ये तरी प्रश्नोत्तराचा तास होणार का? | माजी महापौर संघटनेचा महापौरांना सवाल

PMC General Body Meeting – (The Karbhari News Service) – २०१७-२२ या काळात सभा प्रश्नोत्तरांचा तास कधीही झाला नाही. त्यामुळे चालू पंचवार्षिक मध्ये तरी प्रश्नोत्तराचा तास होणार का, असा सवाल माजी महापौर संघटनेने महापौर मंजुषा नागपुरे (Pune Mayor Manjusha Nagpure) यांना केला आहे.  आपल्या कारकीर्दीत तसे होणार नाही अशी आम्ही अपेक्षा करतो. तसेच Point of information १/२ तासापेक्षा जास्त वेळ देऊ नये. अशी मागणी देखील माजी महापौर संघटनेने केली आहे. (Pune City Ex Mayor Organisation)

महापालिका सभागृहात प्रश्नोत्तराचा तास महत्वाचा मानला जातो. यात नगरसेवक आपल्या प्रभागातील आणि शहराच्या विकास कामाबाबत प्रश्न मांडतात आणि त्यावर चर्चा होते. मात्र मागील म्हणजे २०१७-२२ या कालावधीत हा तास झाला नाही. त्यामुळे आता तरी हा तास घेतला जावा, असे संघटनेने म्हटले आहे. (Pune PMC News)

संघटनेचे सेक्रेटरी अंकुश काकडे यांनी याबाबत महापौर मंजुषा नागपुरे यांना पत्र दिले आहे, त्यात त्यांनी म्हटले आहे कि,  पुणे महानगरपालिका सभागृहाच्या कामकाजाचा आपणांस दीर्घ अनुभव आहे. त्यामुळे आपण सभागृहाचे कामकाज निश्चितच उत्तमपणे कराल असा मला विश्वास आहे. महापौर निवडणुकीचे वेळी सभागृहात अनेक कार्यकर्ते अनधिकृतपणे रिल्स बनवत होते. पहिल्या सभेमध्ये हे ठीक आहे, पण आता मात्र सभागृहात असे काही होणार नाही याची आपण काळजी घ्यावी. तसेच सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका ठेवावी. असे देखील काकडे यांनी पत्रात म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0