Pune Youth Congress | पुणे शहर युवक कॉंग्रेस कमिटी कडून निषेध आंदोलन 

HomeBreaking News

Pune Youth Congress | पुणे शहर युवक कॉंग्रेस कमिटी कडून निषेध आंदोलन 

Ganesh Kumar Mule Dec 21, 2024 8:12 PM

Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांनी स्विकारला सहकार राज्यमंत्रीपदाचा कार्यभार
Amit Shah Pune Tour | महाराष्ट्रात भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार येणार! | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची कार्यकर्त्यांना ग्वाही
Amit Shah in Pune | प्रत्येक क्षेत्रात देशाला अग्रेसर ठेवण्याची प्रेरणा थोरले बाजीराव पेशव्यांच्या जीवनचरित्रातून- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

Pune Youth Congress | पुणे शहर युवक कॉंग्रेस कमिटी कडून निषेध आंदोलन

Dr Babasaheb Ambedkar – (The Karbhari News Service) – पुणे शहर आणि ग्रामीण युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू छिब यांना आसाम पोलिसांनी केलेल्या बेकायदेशीर अटकेचा देखील पुणे शहर युवक काँग्रेस चे अध्यक्ष सौरभ अमराळे यांच्या नेतृत्वात निषेध केला. (Rahul Gandhi)

युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बालगंधर्व चौकात जमून रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान युवक काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.

महाराष्ट्र युवक काँग्रेस सहप्रभारी एहसान खान म्हणाले, “अमित शहा यांचे वक्तव्य अतिशय लज्जास्पद आहे. हे त्यांच्याच मनातील विचार आहेत, जे त्यांच्या तोंडून बाहेर आले. त्यांना या पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही, त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा.”

युवक काँग्रेस मीडिया सेलचे अध्यक्ष अक्षय जैन म्हणाले, “गौतम अदानींवर कारवाई करण्याऐवजी आणि संसदेच्या संयुक्त संसदीय समितीकडून (JPC) चौकशी करविण्याऐवजी सरकार विरोधी पक्षनेते श्री राहुल गांधी यांच्यावर खोटे आरोप लावत आहे. तसेच युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष यांना आसाम पोलिसांनी अटक करणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे.”

पुणे शहर युवक काँग्रेस अध्यक्ष सौरभ अमराळे म्हणाले, “सरकारची ही चाल फक्त मुख्य प्रश्नांवरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी आहे आणि त्यांना या गोष्टींत अडकवून ठेवण्यासाठी आहे. त्यामुळे आम्ही रस्त्यावर उतरून या अन्यायाविरुद्ध लढा देत आहोत.” या रास्तारोको आंदोलनात पुणे शहर युवक कॉंग्रेंसचे अध्यक्ष सौरभ अमराळे , ग्रामीण अध्यक्ष उमेश पवार ,प्रथमेश आबनावे ,मेघश्याम धर्मावत ,आनंद दुबे , ऋषीकेश‌वीरकर ,अभिजित चव्हाण ,सद्दाम शेख ,मुरलीधर बुधराम ,धनराज माने , मारुती तलवारे ,हर्षद हांडे पवन खरात आणि युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0