Pune Water Supply | पुढील आठ ते दहा दिवस या भागात कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा | महापालिका पाणीपुरवठा विभागाची माहिती
Pune Breaking News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका, बंडगार्डन पाणीपुरवठा विभागामार्फत पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील रावेत येथील ७०० मि.मी. व्यासाच्या जागतिक मुख्य जलवाहिनीला रावेत येथील नाल्यामध्ये मोठी गळती आढळून आली आहे. सदर गळती दुरुस्तीचे काम तात्काळ हाती घेण्यात आले होते. मात्र सबंधित ठिकाण दलदलीचे असून जलवाहिनीवर वर विद्युत केबल्स, इंटरनेट केबल्स, ड्रेनेज लाईन, पावसाळी लाईन इत्यादी सेवा वाहिनीचे जाळे असल्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सतत दिवसरात्र प्रयत्न करूनही गळती बंद करणे शक्य झाले नाही. (PMC Water Supply Department)
तांत्रिक व सुरक्षिततेच्या दृष्टीने सदर जलवाहिनी दुरुस्ती ऐवजी त्याठिकाणी नवीन पर्यायी जलवाहिनी टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार काम सुरु करण्यात आले आहे. परंतु सदरची लाईन सुमारे २० फुट खोल असून हापरिसर दलदलीचा व त्यावर सेवावाहिन्याने व्यापला असल्याने काम करण्यास अडथळे येत आहेत अशा प्रतिकूल परिस्थितीतनवीन जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यास अंदाजे आठ ते दहा दिवसाचा कालावधी लागणार आहे.
सदर कालावधीत जागतिक लाईन बंद करण्यात आली असून त्या लाईनवरून पाणीपुरवठा होत असलेल्या परिसराला पर्यायी पाण्याच्या लाईन मधून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे रावेत येथील पर्यायी नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण होईपर्यंत खालील भागात कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होणार आहे.
कळस माळवाडी, जाधववस्ती, गणेशनगर (बोपखेल), विश्रांतवाडी अंशतः, म्हस्के वस्ती, संजय पार्क, बर्माशेल, विमानतळ व सभोवतालचा परिसर

COMMENTS