Pune Water Issue | पुण्याचा पाण्याचा कोटा २२ TMC करुन द्या | जलसंपदा मंत्री यांच्याकडे करण्यात आली मागणी 

Homeadministrative

Pune Water Issue | पुण्याचा पाण्याचा कोटा २२ TMC करुन द्या | जलसंपदा मंत्री यांच्याकडे करण्यात आली मागणी 

Ganesh Kumar Mule Jan 20, 2025 7:58 PM

Pune Water Crisis | पुणेकरांवर उन्हाळ्याआधीच पाणीसंकट! | दररोज 250-300 MLD पाणीकपात करण्याच्या पाटबंधारे विभागाच्या सूचना
PMC Pune Water Budget | समाविष्ट 34 गावांच्या पाण्यावरून पुणे महापालिकेने पाटबंधारे विभागाला सुनावले | वाचा काय आहे प्रकरण
Pune Water Supply | पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले २०५२ पर्यंतच्या पाण्याचे नियोजन | पाटबंधारे विभागाकडे मागितले ३४.७१ टीएमसी पाणी!

Pune Water Issue | पुण्याचा पाण्याचा कोटा २२ TMC करुन द्या | जलसंपदा मंत्री यांच्याकडे करण्यात आली मागणी

 

Pune Water Quota – (The Karbhari News Service) – पुण्याचा पाण्याचा कोटा २२ TMC करुन द्या, अशी जलसंपदा मंत्री यांच्याकडे सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर (Vivek Velankar) यांनी मागणी  केली आहे. तसेच पुणेकरांच्या करांच्या पैशातून १०० कोटी रुपये खर्च करून पुण्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून शेतीसाठी पुनर्वापर करण्याच्या योजनेतील ४० % च पाणी  जलसंपदा विभाग वापरु शकतोय. असे देखील वेलणकर यांनी म्हटले आहे. (Pune News)

पुण्याची  वाढती लोकसंख्या, हद्दीत समाविष्ट होत असलेली गावे लक्षात घेऊन पुण्याचा पाण्याचा कोटा वाढला पाहिजे ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. मात्र यावर नुकतेच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पुणे महापालिका किती सांडपाणी प्रक्रिया करुन पुढे सोडते यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते.

याबाबत वेलणकर यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे कि, पुण्याला ४ धरणांचं वरदान लाभलं आहे ज्यामध्ये २९ TMC पाण्याचा साठा होतो. हे पाणी पुण्याच्या पाण्याची तसेच दौंड इंदापूर पर्यंतच्या शेतीची तहान भागवतं. पुण्याने जास्त पाण्याची मागणी केली की शेतीला पाणी कमी पडू शकतं आणि विनाकारण शहरी विरुद्ध ग्रामीण असा संघर्ष उभा राहतो म्हणून पुण्याने वापरलेले पाणी प्रक्रिया करून शेतीला पुनर्वापरासाठी मिळावे याकरिता पुणे महापालिकेने २०१५ मध्ये पुणेकरांच्या करांचे १०० कोटी रुपये वापरून मुंढवा जॅकवेल येथे पुण्याचे सांडपाणी प्रक्रिया करून शेतीसाठी पुनर्वापर करण्यासाठी प्रकल्प उभारला. यात रोजचे ५५० MLD अर्थात वर्षाला ६.५ TMC सांडपाणी प्रक्रिया करून शेतीसाठी पुनर्वापर करण्यासाठी उपलब्ध करण्याची क्षमता निर्माण केली गेली. मात्र आपला जलसंपदा विभाग हे पाणी वापरण्यास कमी पडला.

वेलणकर यांनी पुढे म्हटले आहे कि,  मला माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार २०१६ पासून २०२४ डिसेंबर अखेरपर्यंत ९ वर्षांत क्षमतेच्या जेमतेम ३५ टक्के ( २२.५ TMC) प्रक्रिया केलेले सांडपाणी जलसंपदा विभाग शेतीसाठी पुनर्वापर करु शकला. १ जानेवारी२०२५ पासून आजपर्यंत तर १०% क्षमतेने पण शेतीसाठी पाणी उचलले गेले नाहीये. हे आपल्या खात्याचे अपयश आहे आणि त्यासाठी पुण्याच्या पाणीकोट्यातील वाढ रोखून धरणे निश्चितच अन्यायकारक आहे.

——–

मुंढवा जॅकवेल प्रकल्पातून शेतीसाठी उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा १००% वापर करण्यास आपल्या खात्यास भाग पाडावे जेणेकरुन शेतीची गरज भागेल आणि पुण्याचा पाण्याचा कोटा २२ TMC करुन द्यावा.

  • विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच, पुणे

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0