Pune Water Cut | १० ते १३ जानेवारी या काळात या भागातील पाणीपुरवठा राहणार अंशतः बंद अथवा विस्कळीत!
Pune Water Supply – (The Karbhari News Service) – रावेत उपसा केंद्र येथून पुणे शहरात पाणीपुरवठा करणारी मुख्य पाण्याची जलवाहिनी मोठ्या प्रमाणात गळती झाली आहे. ती दुरुस्त करण्याची कामे शनिवार १० ते मंगळवार १३ जानेवारी दरम्यान करण्यात येणार आहे. त्यासाठी खालील भागातील पाणीपुरवठा या काळात अंशतः बंद अथवा विस्कळीत राहणार आहे. तरी नागरिकांनी याबाबतची नोंद घ्यावी व सहकार्य करावे. असे आवाहन प्र. अधिक्षक अभियंता लष्कर पाणीपुरवठा विभाग यांनी केले आहे. (PMC Water Supply Department)
पाणीपुरवठा अंशतः बंद अथवा विस्कळीत असणारा भाग
कळस माळवाडी, जाधव वस्ती, गणेश नगर (बोपखेल), विश्रांतवाडी अंशतः, म्हस्के वस्ती, संजय पार्क, बर्मा शेल, विमानतळ व सभोवतालचा परिसर.

COMMENTS