Pune Water cut on Thursday | येत्या गुरुवारी पूर्ण शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद! | शुक्रवारी कमी दाबाने पाणी

HomeBreaking Newsपुणे

Pune Water cut on Thursday | येत्या गुरुवारी पूर्ण शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद! | शुक्रवारी कमी दाबाने पाणी

गणेश मुळे Apr 01, 2024 12:49 PM

Pune Water cut on Thursday | येत्या गुरुवारी पूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद!
Pune Water cut on Thursday | येत्या गुरुवारी शहराच्या काही भागातील पाणीपुरवठा राहणार बंद!
Pune Water Cut on Friday | देखभाल दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद ठेवताय, तर त्याचे तपशील जाहीर करा

Pune Water cut on Thursday | येत्या गुरुवारी पूर्ण शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद! | शुक्रवारी कमी दाबाने पाणी

 

Pune Water Cut on Thursday – (The Karbhari News Service) – येत्या गुरूवारी वारजे जलकेंद्र व त्या अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब GSR टाकी परिसर, वारजे जलकेंद्र लगत GSR टाकी परिसर, वारजे रॉ वॉटर पंपिंग, गणपती माथा व जुने वारजे जलकेंद्र, एस.एन.डी.टी. (एच.एल. आर.) टाकी परिसर तसेच कोंढवे धावडे जलकेंद्र व रॉ वॉटर पंपिंग, वडगाव जलकेंद्र अंतर्गत वडगाव जलकेंद्र (वडगाव रॉ वॉटर, राजीव गांधी पंपिंग, केदारेश्वर पंपिंग, आगम पंपिंग, श्रीहरी पपिंग, संस्था इ. (Institute), भामा आसखेड तसेच नवीन लष्कर जलकेंद्र व त्या अंतर्गत रामटेकडी व खराडी टाकी परिसर येथील विद्युत / पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्या कारणामुळे अत्यावश्यक देखभाल दुरूस्तींचे कामांसाठी पंपींगचे अखत्यारीतील पूर्ण दिवसाचा म्हणजे गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. (PMC Water Supply Department)

तसेच शुक्रवार रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग-

वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर :- पाषाण साठवण टाकी, भूगाव रोड परिसर, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी, मधुवन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनी व चढावरील भाग, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सुरज नगर, सागर कॉलनी, भारतीनगर, बावधन परिसर, सारथीशिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीबन सोसायटी परिसर, डुक्कर खिंडीकडील भाग, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंस नगर, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाणतांडा, मोहन नगर, सुस रोड, इत्यादी..
गांधी भवन टाकी परिसर :- कुंभारवाडी टाकी परिसर, काकडे सिटी, होम कॉलनी, सिप्ला फाउंडेशन, रेणुका नगर, हिल व्यू गार्डन सिटी, पाप्युलर कॉलनी, वारजे माळवाडी परिसर, गोकुळनगर, अतुलनगर, बी. एस.यु.पी स्कीम, महात्मा सोसायटी परिसर, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कुमार परिसर, धनंजय सोसायटी, रोहन गार्डन परिसर, कोथरूड वॉर्ड ऑफिस परिसर, अथर्व वेद, स्नेहल अमित पार्क, कांचन गंगा, अलकनंदा, शिवप्रभा मंत्री पार्क -१, आरोह सोसायटी, श्रावण धारा झोपडपट्टी, सहजानंद (पार्ट), शांतीवन गांधी स्मारक, किर्लोस्कर डीझेल कंपनी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, मृणमयी प्रीमारोज आर्चिड लेन ७ व ९. मुंबई पुणे बायपास रोड दोन्ही बाजू. शेरावती सोसायटी, सिद्धकला सोसायटी, श्रीराम सोसायटी, गिरीष सोसायटी, तिरुपती नगर, कुलकर्णी हॉस्पिटल परिसर, हिंगणे होम कॉलनी, मिलेनियम स्कूल, कर्वेनगर गावठाण, तपोधाम परिसर, राम नगर, गोसावी वस्ती, कॅनॉल रोड.
पॅनकार्ड क्लब GSR टाकी परिसर :- बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅनकार्ड क्लबरोड, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडिपॉईंट रोड, विजयनगर, आंबेडकरनगर, दत्त नगर,
इ.

वारजे जलकेंद्र लगत GSR टाकी परिसर:– कर्वे नगर गावठाण परिसर, तपोधाम सोसायटी, शाहू कॉलनी गल्ली क्र. १ ते ११, इंगळेनगर, वारजे जकात नाका परिसर, कर्वेनगर कॅनॉल गल्ली क्र. १ ते १०

एस.एन.डी.टी. (एच.एल. आर.) टाकी परिसर :– गोखलेनगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, रेव्हेन्यू कॉलनी, कोथरूड संपूर्ण भाग, वडार वस्ती, स्टेट बैंक कॉलनी, श्रमिक वसाहत, हॅपी कॉलनी, मेघदूत, तेजस नगर, डहाणूकर कॉलनी, सुतारदरा, किष्किंदा नगर, जयभवानी नगर, रामबाग कॉलनी, हनुमान नगर, केळेवाडी, गुजरात कॉलनी, गाढवे कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनी, आयडीयल कॉलनी, वडारवाडी, सेनापती बापट रोड, जनवाडी, वैदुवाडी, भोसले नगर, अशोकनगर, खैरेवाडी, शिवाजी हौ. सोसायटी, भांडारकर रोड, प्रभात रोड, सेनापती बापट रोड, हनुमाननगर, जनवाडी, वैदुवाडी, वडारवाडी, पोलीस लाईन, संगमवाडी.
कोंढवे – धावडे जलकेंद्र :- वारजे हाय-वे परिसर, रामनगर, उत्तम नगर, शिवणे, कोंढवे धावडे, न्यु कोपरे.
जुने वारजे जलकेंद्र भाग:– रामनगर, अहिरेगाव, माळवाडी, सहयोगनगर पठार, गोकुळनगर पठार, विठठलनगर, ज्ञानेश सोसायटी, यशोदिप चौक, मामासाहेब मोहोळ शाळा परिसर, अमर भारत सोसायटी, गणपती माथा परिसर, एनडीए रोडचा काही भाग, पॉप्युलर कॉलनी इत्यादी.
वडगाव जलकेंद्र परीसर :- तुकाई नगर, राम नगर, हिंगणे, आनंद नगर, माणिक बाग, दामोदर नगर, खोराड वस्ती, साईनगर, विश्रांतीनगर, आनंद विहार, महादेव नगर, वडगाव बु., धायरी, जाधव नगर, शेळके नगर, वडगाव बु गावठान, शांतीनगर, रेणुका नगरी पारिसर, दाभाडी, गोसावी वस्ती, मिनाक्षी पुरम, भन्साळी कॉम्प्लेक्स कात्रज आगम मंदिर, बालाजीनगर-दत्तनगर, टेल्को कॉलनी परिसर, संतोषनगर मुख्य रस्ता महावीरकुंज, रेलीकॉन,दत्त नगर- आंबेगाव रस्ता, दत्त नगर चौक, सुखसागरनगर, धनकवडी, आंबेगाव पठार, दत्तनगर, संतोषनगर,जांभूळवाडी रोड, आंबेगाव रोड, धनकवडी गावठाण परिसर, तळजाई परिसर, सहकारनगर भाग १ व २.
कात्रज-कोंढवा बुद्रुक परिसर– कात्रज गाव, गुजरवाडी फाटा, निंबाळकर वस्ती, उत्कर्ष, राजस, इंद्रप्रस्थ, भूषण सोसायटी परिसर, सुखसागर नगर भाग-१ व भाग-२, कात्रज-कोंढवा रस्ता, शिवशंभो नगर, गोकुळनगर, श्रीकृष्ण मंदिर परिसर, इस्कॉन मंदिर परिसर, टिळेकर नगर, येवलेवाडी, कोंढवा गाव, आंबेडकर नगर, लक्ष्मीनगर परिसर, काकडेवस्ती, अशरफनगर, ग्रीन पार्क, साईनगर, गजानन नगर, राजीव गांधी नगर, खडीमशिन परिसर, पारगेनगर.
भामा आसखेड जलकेंद्र परिसर :- लोहगाव, विमाननगर, वडगाव शेरी, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा, धानोरी, इत्यादी
लष्कर ते खराडी पंपींग क्लोजर मुळे पाणी पुरवठा बंद होणारा परीसर – खराडी गावठाण, आपले घर, तुळजाभवानी नगर, ईऑन परीसर, चौधरी वस्ती, सातव वस्ती, थिटे वस्ती, तुकाराम नगर, यशवंत नगर, चंदन नगर, सुनिता नगर, धर्म नगर, सोमनाथ नगर, गार्डेनिया, धनलक्ष्मी सोसायटी, गणेश नगर, आनंद पार्क, राजश्री कॉलनी,मते नगर, महावीर नगर, माळवाडी, मुन्नुरवार सोसायटी इत्यादी.
लष्कर जलकेंद्र भाग :- संपुर्ण रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, सय्यद नगर, हेवन पार्क, गोसावी वस्ती शंकर मठ, वैदूवाडी, राम नगर, आनंद नगर, हडपसर गावठाण, सातववाडी, गोधळे नगर, ससाणे नगर, काळेपडळ, मुंढवा, माळवाडी, सोलापूर रोड डावी बाजू, केशवनगर मांजरी बु., शेवाळेवाडी, बी.टी. कवडे रोड, भीमनगर, बालाजी नगर, विकास नगर, कोरेगाव पार्क, ओरीयंट गार्डन, साडेसतरा नळी, महंमदवाडी रस्ता उजवी कडील संपूर्ण भाग, संपूर्ण हाडेवाडी रोड, फुरसुंगी उरुळी देवाची भेकराई नगर (टँकर द्वारे पाणीपुरवठा बंद)
नवीन व जुने होळकर जलकेंद्र अंतर्गत पाणी पुरवठा बंद असणारा भाग:– मुळा रोड, खडकी कॅन्टॉनमेंट संपूर्ण परिसर, MES, “HE Factory, हरीगंगा सोसायटी इत्यादी.