Pune Water Cut News | पुण्यातील काही भागात गुरुवारी 24 तास पाणीपुरवठा बंद!

Homeadministrative

Pune Water Cut News | पुण्यातील काही भागात गुरुवारी 24 तास पाणीपुरवठा बंद!

Ganesh Kumar Mule Jul 20, 2026 9:32 PM

PMC Standing Committee  | आकांक्षा फाउंडेशनचा 101 कोटींचा प्रस्ताव थांबला |  शिक्षण समितीमार्फतच पुढे जाणार
Pradhanmantri Matru Vandana Yojana | तीन हजार अंगणवाडी मदतनीसांना मिळणार पदोन्नती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Chikharde-Gormale road | चिखर्डे-गोरमाळे रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत बांधकाम विभागाकडे तक्रार  | 8 दिवसांत रस्ता नियमानुसार न केल्यास आंदोलनाचा इशारा 

Pune Water Cut News | पुण्यातील काही भागात गुरुवारी 24 तास पाणीपुरवठा बंद!

| जलवाहिनी स्थलांतर आणि दुरुस्तीच्या कामामुळे महापालिकेचा निर्णय

Pune Water Supply – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या बंडगार्डन पाणीपुरवठा विभागामार्फत महत्वाची दुरुस्ती आणि स्थलांतराची कामे हाती घेण्यात आल्याने येत्या गुरुवारी शहरातील मोठ्या भागाचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. शुक्रवारीही पाणी उशिरा आणि कमी दाबाने येणार असल्याचे महापालिकेने कळवले आहे. (PMC Water Supply Department)

1. पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील निगडी भक्ती शक्ती चौक येथील जागतिक बँक मुख्य जलवाहिनीचे स्थलांतर करण्याचे काम
2. होळकर जलशुद्धीकरण केंद्र येथील विद्युत विपयक दुरुस्ती व गळतीची कामे

ही दोन्ही कामे गुरुवार, दि. 23  रोजी करण्यात येणार आहेत. त्यामुळे त्या दिवशी पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे.

शुक्रवारी कमी दाबाने पाणी
तसेच शुक्रवार, दि. 24  रोजी कामानंतर पाणीपुरवठा सुरळीत होण्यास वेळ लागणार असल्याने त्या दिवशी पाणी उशिरा आणि कमी दाबाने सोडण्यात येणार आहे. नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

पाणीपुरवठा बंद असणारे प्रमुख भाग खालीलप्रमाणे आहेत:

*1) बंडगार्डन पाणीपुरवठा विभागातील भाग:*
म्हस्के वस्ती, गणेशनगर (बोपखेल), कळस माळवाडी, जाधवस्ती, विश्रांतवाडी अंजन, मंजय पार्क, बर्माशेल, विमानतळ व मभोवतालाचा परिसर, खराडीचा काही परिसर, हरी गंगा टाकीवर अवलंबून असणारा भाग – डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटी, अहिल्यानगर, स्वा. मॅनिक नगर, हरीगंगा सोसायटी, साप्रस, समाज कल्याण वसतिगृह, विश्रांतवाडी पोलिस लाईन, आरोग्यभवन, शांतीनगर, भारतनगर, कतारवाडी, प्रतिकनगर, जेसिडी पार्क, वृंदावन सोसायटी, उत्तम टाऊन शिप, मित्तल सोसायटी, ड्रीम सोसायटी, जाधव नगर, पंचशील नगर, श्रमिक नगर, कामगार नगर, चंद्रमा नगर.

*2) चतुश्रृंगी पाणीपुरवठा विभागातील भाग:*
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड, अॅम्युनेशन फॅक्टरी खडकी, मुळा रोड परिसर, भोईटे वस्ती.

नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा आणि आगाऊ साठा करून ठेवावा, असे आवाहन प्र. अधीक्षक अभियंता, लष्कर पाणीपुरवठा विभाग, पुणे महानगरपालिका यांनी केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: