Pune water Crisis | पुण्याच्या उशाला 4 धरणं तरीही 4 लाख टँकर ने पुणेकरांची भागवली जातेय तहान!

HomeBreaking Newsपुणे

Pune water Crisis | पुण्याच्या उशाला 4 धरणं तरीही 4 लाख टँकर ने पुणेकरांची भागवली जातेय तहान!

गणेश मुळे Apr 02, 2024 3:29 AM

 Emphasis of Pune Municipal corporation (PMC) Water Supply Department on breaking unauthorized taps 
Water supply will be closed in some parts of the Pune city on Thursday
Water cut in Pune on Thursday | येत्या गुरुवारी शहराच्या काही भागांत पाणीपुरवठा बंद राहणार | जाणून घ्या परिसर

Pune water Crisis | पुण्याच्या उशाला 4 धरणं तरीही 4 लाख टँकर ने पुणेकरांची भागवली जातेय तहान!

Pune Water Crisis – (The Karbhari News Service) – पुणे शहराची पाण्याची (PMC Water Supply) तहान वरचेवर वाढतानाच दिसून येत आहे. पुण्याच्या उशाला चार धरणे आहेत. भामा आसखेड, पवना धरणातून पाणी घेतले जाते. तरीही पुण्याची तहान भागत नाही. वर्षभरात पुण्याला 4 लाख हून अधिक टँकर (Pune Water Tanker) ची आवश्यकता भासत आहे. एवढे असून पाण्याच्या खूप तक्रारी येत राहतात. आगामी काळात ही परिस्थिती भयंकर होणार, असा अंदाज आहे. समान पाणीपुरवठा (PMC Equal Water Scheme) पुण्याला कधी होणार, असा प्रश्न या निमित्ताने नागरिक विचारत आहेत. (PMC Water Supply Department)
पुणे शहराला खडकवासला साखळी प्रकल्पातील पानशेत, खडकवासला, टेमघर आणि वरसगाव धरणातून तसेच भामा आसखेड आणि पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या माध्यमातून वर्षभरात 16 टीएमसी पाणी वापरले जाते. असे असले तरी हे पाणी कमीच पडताना दिसून येते. कारण नागरिकांना होत असलेला असमान पाणीपुरवठा. काही ठिकाणी मुबलक पाणी मिळते तर काही ठिकाणी पाण्याच्या थेंबासाठी चातकासारखी वाट पाहावी लागते. त्यामुळे महापालिका या लोकांना टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करते. (Pune Municipal Corporation (PMC)
काही टँकर हे महापालिका पुरवते तर काही ठिकाणी ठेकेदारांचे टँकर वापरावे लागते. काही ठिकाणी नागरिक स्वतः चलन करून टँकर ची सुविधा उपलब्ध करून घेतात. त्यासाठी महापालिकेने टँकर पॉईंट उपलब्ध करून दिले आहेत.
पुणे शहरात 34 गावांचा समावेश झाला आहे. या गावांना पाणी देता देता पालिकेच्या नाकी नऊ आले आहे. इथे टँकर देखील कमी पडतात. सगळ्याच ठिकाणी धरणातील टँकर भरणा केंद्रावरून पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे नागरिकांना बोअरिंग चे पाणी वापरण्याची वेळ येते. त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.
दरम्यान महापालिका पाणीपुरवठा विभागाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीत 4 लाख 348 टँकर चा वापर करण्यात आला. त्या आधी म्हणजे 2022-23 या वर्षात 3 लाख 54 हजार 254 टँकर चा वापर शहर आणि परिसरात करण्यात आला. तर त्या पूर्वी म्हणजे 2021-22 या वर्षात 3 लाख 6 हजार 842 टँकर वापरले गेले. पुढील दोन महिन्यात तर अजून तर जास्त पाणी लागणार आहे. हा प्रश्न वाढतच जाणार आहे. त्यासाठी समान पाणीपुरवठा करणे, हा एकच पर्याय सध्यातरी समोर दिसतो आहे.

2023-24 या वर्षात वापरले गेलेले टँकर

एप्रिल – 33643
मे – 35590
जून – 35216
जुलै – 33613
ऑगस्ट – 31892
सप्टेंबर – 31965
ऑक्टोबर – 32659
नोव्हेंबर – 28398
डिसेम्बर – 32542
जानेवारी – 32580
फेब्रुवारी – 33951
मार्च – 38299
एकूण – 400348 (चार लाख 348)