Pune Traffic | शहरातील वाहतूक सुधारणा करण्याबाबत महापालिका आणि पोलिसांची संयुक्त बैठक!

Homeadministrative

Pune Traffic | शहरातील वाहतूक सुधारणा करण्याबाबत महापालिका आणि पोलिसांची संयुक्त बैठक!

Ganesh Kumar Mule Sep 24, 2025 8:35 PM

PMC Holiday | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना भाऊबीज ची सुट्टी जाहीर!
MLA Sunil Kamble | गुलटेकडी च्या धर्तीवर काशेवाडी मधील नवीन एस आर ए प्रकल्प राबवला जावा | आमदार सुनील कांबळे यांची महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी 
Khadakwasla Dam | खडकवासला प्रकल्पातील ४ धरणे ५४ टक्के क्षमतेने भरली | धरणात १५.७४ टीएमसी पाणी

Pune Traffic | शहरातील वाहतूक सुधारणा करण्याबाबत महापालिका आणि पोलिसांची संयुक्त बैठक!

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे शहरातील वाहतूक समस्येवर भूसंपादन वगळता अन्य मुद्द्यांवर कार्यवाही करून (low Hanging Fruits) वाहतूक व्यवस्थेची गती वाढविण्याच्या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त यांचे अध्यक्षतेखाली आज रोजी बैठक आयोजित केलेली होती. बैठकीमध्ये शहरातील वाहतूक सुधारणा करण्याचे अनुषंगाने चर्चा होऊन निर्देश देण्यात आले. यावेळी पोलीस अधिकारी देखील उपस्थित होते. (Pune Traffic Police)

शहरातील सुमारे ८५% वाहतूक ज्या ३२ रस्त्यांवरून होते त्या ३२ रस्त्यावरील तसेच २२ जंक्शनमध्ये होणारी वाहतूक कोंडी समस्या बाबत जागेवर स्थळ पाहणी करून उपाययोजना सुचाविण्याबाबत विविध विभागाच्या अभियंत्यांची पथके स्थापन केली होती. त्यानुसार त्यांनी स्थळपाहणी करून सविस्तर अहवाल सादरीकरण आजच्या बैठकीत केले. या बैठकीत रस्ता निहाय सखोल आढावा घेण्यात आला. वाहतूकीमध्ये अडथळा ठरणारी झाडे, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण यांचेकडील विद्युत खांब, त्यांचे बॉक्स, पाण्याचे वॉल्व्ह, अनधिकृत रिक्षा थांबे, अनधिकृत चार चाकी पार्किंग, अतिक्रमणे, फूटपाथ वरील अतिक्रमणे, रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांना नाजिकच्या भाजीमंडई मध्ये शिफ्ट करणे, मेट्रो कडील बाबी, PMPML बस थांब्यावर bus bay तसेच बस स्टॉप नजिक अन्य वाहतूक सुरू राहील अशा पध्दतीने बस थांबविणे ची गरज अनावश्यक यु-टर्न इत्यादी बाबत उपाय सुचविले. तसेच अतिक्रमण कारवाई करताना पोलिस विभाग वाहतूक पोलीस विभाग आणि मनपा यांनी संयुक्तपणे कारवाई करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन करण्यात आले.

या  उपाययोजना साठी निधी ची तरतूद कमी प्रमाणात लागणार असल्याने संबंधित विभागामार्फत उपरोक्त प्रमाणे तातडीने कार्यवाही करून वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करणेबाबत संबंधितांना सूचित करणेत आले.  एक महिन्याच्या मुदतीत कार्यवाही करून अहवाल सादर करावा असे महापालिका आयुक्त यांनी आदेश दिले. त्याबाबत पुन्हा आढावा घेण्यात येईल. या उपाय योजनांमुळे सुमारे १०-२० % शहरातील वाहतूक सुधारणा होण्यास मदत होईल अशी शक्यता वर्तविण्यात आली.

सदर बैठकीसाठी  मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त, एम.जे.प्रदीप चंद्रन, अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल), अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे,  हिम्मत जाधव, पोलीस उपायुक्त, शहर अभियंता, मुख्य अभियंता (पथ) तसेच पथ विभाग, बांधकाम विभाग, प्रकल्प विभाग, पाणीपुरवठा विभाग, अतिक्रमण विभाग, विद्युत विभाग, मलनि:सारण विभाग, परिमंडळ कार्यालय क्र.१ ते ५ तसेच १५ क्षेत्रिय कार्यालये इत्यादी विभागांचे उपायुक्त / खातेप्रमुख, अभियंते व सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0