Pune Rains | पाण्याचा विसर्ग वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन | आपत्कालीन संपर्क क्रमांक जाणून घ्या
| आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी पीएमआरडीए तत्पर
Pune News – (The Karbhari News Service) – गेल्या दोन दिवसापासून पुणे शहरासह जिल्हाभरात दमदार पाऊस होत असल्याने या पावसामुळे धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग सातत्याने वाढत आहे. यामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असून नदीलगतच्या नागरी वस्तीत पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे. (Pune Rain News)
हवामान खात्याने पुणे शहरासह जिल्हात रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे असून नदीलगतच्या नागरी वस्तीतील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांनी नदीकाठ किंवा पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळावे, घरातील आवश्यक कागदपत्रे व मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व जनावरांची योग्य ती खबरदारी घ्यावी यासह प्रशासनाकडून वेळोवेळी मिळणाऱ्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदतीसाठी पीएमआरडीए आपत्ती व्यवस्थापन दल, अग्निशमन दल तत्पर आहे. नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पीएमआरडीएचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी केले आहे.
आपत्कालीन संपर्क क्रमांक
पुणे महानगर आपत्ती प्रतिसाद पथक (PDRF) 9545282930
वाघोली अग्निशमन केंद्र -02029518101
मारुंजी अग्निशमन केंद्र -02067992101
नांदेडसिटी अग्निशमन केंद्र -0206752001/2

COMMENTS