Pune Rain | PMC Pune | पुणे महापालिकेने उपाययोजना करूनही रस्त्यावर पाणी साचते; म्हणजे हा दोष पाण्याचाच!

HomeBreaking Newsपुणे

Pune Rain | PMC Pune | पुणे महापालिकेने उपाययोजना करूनही रस्त्यावर पाणी साचते; म्हणजे हा दोष पाण्याचाच!

गणेश मुळे Jul 09, 2024 6:35 AM

PMC pune Officers | पथ विभागाची जबाबदारी अनिरुद्ध पावसकर यांच्याकडे तर पाणीपुरवठा विभागाची जबाबदारी नंदकिशोर जगताप यांच्याकडे | मुख्य कामगार अधिकाऱ्याचा अतिरिक्त पदभार नितीन केंजळे यांच्याकडे
Health Minister Dr. Tanaji Sawant | आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांनी पुणे महापालिका आयुक्तांना दिले हे आदेश
Pune Speed Breakers | महापालिका पथ विभागाने शास्त्रीय मानकांप्रमाणे असलेले स्पीड ब्रेकर दाखवावे  | प्रति स्पीड ब्रेकर १०० रुपये बक्षीस देऊ 

Pune Rain | PMC Pune | पुणे महापालिकेने उपाययोजना करूनही रस्त्यावर पाणी साचते; म्हणजे हा दोष पाण्याचाच!

| विवेक वेलणकर यांची महापालिकेच्या कारभारावर विडंबनात्मक टीका

PMC Road Department – (The Karbhari News Service) – पुणे शहरात काल रात्रीच्या थोड्याशा पावसात रस्त्यावर तळी साचली होती. पाणी साचू नये म्हणून पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation (PMC) केलेल्या उपाययोजना पाण्यात गेल्याचे दिसून येत आहे. मात्र उपाययोजना करूनही पाणी साचते हा दोष पाण्याचाच आहे. अशी विडंबनात्मक टीका सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर (Vivek Velankar Sajag Nagrik Manch) यांनी महापालिकेच्या कारभारावर केली आहे. (Pune Rain News)
 वेलणकर यांनी सांगितले कि, पुणे महापालिकेने रस्त्यावर  पाणी साचू नये म्हणून स्पॉट शोधून उपाययोजना केल्याचे सांगितले. त्याअंतर्गत म्हात्रे पूल ते राजाराम पूल दरम्यानच्या डी पी रोडवर फूटपाथ खणून त्यात पाईप टाकून ते पावसाळी गटाराला जोडले. काम सुरू असतानाच जागेवर अभियंत्यांना भेटून हे पैसे पाण्यात जातील असे सांगितले होते. काल रात्री झालेल्या थोड्याशा पावसात  या रस्त्यावर साचलेल्या पाण्याला ते पाईप आणि चेंबर दिसले नाहीत. आणि ते त्या पाईपच्या आणि चेंबरच्या बाजूला साचून राहिले.
वेलणकर पुढे म्हणाले, अर्थातच यात दोष नि:संशयपणे पाण्याचाच आहे. नवसह्याद्री पोस्ट ऑफिस समोरच्या रस्त्यावर काही महिन्यांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले. त्या रस्त्यावर पावसाळी गटारे आहेत. पण रस्त्याचा उतार आणि पावसाळी गटारांची झाकणे यांच्या पातळीत फरक असल्याने त्या झाकणाभोवती पाणी साचून राहिले आहे. अर्थातच हा दोष नि:संशयपणे पाण्याचाच आहे. पाणी साचू नये म्हणून आपल्या रस्ते विभागाने केलेल्या अप्रतिम कामगिरीचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. असाही टोला वेलणकर यांनी लगावला आहे.
—–