Pune Pub News | पुण्यातील वाढत्या पब अनाचाराला आवर घाला | महायुती

HomeBreaking Newsपुणे

Pune Pub News | पुण्यातील वाढत्या पब अनाचाराला आवर घाला | महायुती

गणेश मुळे May 20, 2024 3:13 PM

Creative Foundation | उद्यापासून क्रिएटिव्ह फाऊंडेशन आणि कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान च्या वतीने रंगणार कोथरूड नवरात्र महोत्सव – संदीप खर्डेकर यांची माहिती
MLA Sunil Kamble | महारोजगार मेळावा व मार्गदर्शन शिबिराला तरूणांचा उस्फूर्त प्रतिसाद
Arvind Shinde | PMC Pune | महापालिकेच्या बांधकाम विभागावर अरविंद शिंदे यांचे आहे लक्ष! | महापालिका आयुक्त यांच्याकडे केल्या या मागण्या | वाचा सविस्तर 

Pune Pub News | पुण्यातील वाढत्या पब अनाचाराला आवर घाला | महायुती

Pune Pub and Bar – (The karbhari News Service) – पुणे शहरात काल घडलेल्या अत्यंत दुःखद अपघातामुळे दोन संगणक अभियंता प्राणास मुकले. त्या संदर्भात आज भाजपा प्रदेश सरचिटणीस  मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रणित महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना निवेदन दिले.

पुणे शहर हे विद्येचे माहेरघर असून गेल्या काही काळापासून अनिर्बंध पद्धतीने वाढत असलेली पब संस्कृती पुण्याच्या या प्रतिष्ठेला धक्का देत आहे. तसेच त्यामुळे अल्पवयीन मुलांमध्ये वाढणारे व्यसन आणि त्यामुळे होणारे अपघात याला आळा घालायचा असेल तर पुण्यातील पब वर अत्यंत कठोर निर्बंध घालणे आवश्यक आहे असे  मुरलीधर मोहोळ यांनी आयुक्तांना सांगितले.

यावेळी मुरलीधर मोहोळ, हर्षदा फरांदे, राजेंद्र शिळीमकर, दीपक पोटे, राजेश येनपुरे, योगेश टिळेकर, गणेश बिडकर, संदीप खर्डेकर, सुशील मेंगडे, सिद्धार्थ धेंडे, अजय भोसले, प्रदीप देशमुख, लतीफ शेख, रूपाली पाटील, , हेमंत लेले, पुष्कर तुळजापूरकर, राहुल भंडारे व इतर महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी कालच्या अपघाता संदर्भात पोलिसांनी काय काय कारवाई केली आहे याची सविस्तर माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. पुण्यामधील वाढत्या पब संस्कृतीला आळा घालण्यासाठी आवश्यकता सर्व कठोर उपाय योजना करण्यात येतील असे आश्वासन पोलीस आयुक्त यांनी उपस्थित शिष्टमंडळाला केले.