Pune Property Tax | अवघ्या तीन महिन्यात मिळकत कर विभागाने आपले 50% टार्गेट केले पूर्ण! 

Homeadministrative

Pune Property Tax | अवघ्या तीन महिन्यात मिळकत कर विभागाने आपले 50% टार्गेट केले पूर्ण! 

Ganesh Kumar Mule Jul 30, 2025 9:32 PM

PMC Property Tax Department | मिळकत करामध्ये ५% ते १०% सवलतीचा कालावधी १५ दिवसांनी वाढवणार! | मिळकत कर विभागाकडून हालचाली 
Pune Property Tax PT 3 | शिवसेना नेते पृथ्वीराज सुतार यांचा मिळकतकर विभागाच्या उपायुक्तांना आंदोलन करण्याचा इशारा
PMC Municipal Secretary Department | महापालिकेच्या नगरसचिव विभागाकडे जवळपास ४० वर्ष काम करणारे कड, बहिरट सेवानिवृत्त!

Pune Property Tax | अवघ्या तीन महिन्यात मिळकत कर विभागाने आपले 50% टार्गेट केले पूर्ण!

| मिळकत करातून महापालिकेला मिळाले १५०० कोटी हून अधिक उत्पन्न

| उपायुक्त अविनाश सपकाळ यांची माहिती

 

Avinash Sapkal PMC – (The Karbhari News Service)  – पुणे महापालिकेच्या मिळकतकर विभागाने आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात चांगलीच मजल मारली आहे. विभागाने अवघ्या तीन महिन्यात वर्षभराचे अर्धे टार्गेट पूर्ण केले आहे. विभागाने १५०० कोटींहून अधिक उत्पन्न मिळवले आहे. विभागाला या वर्षात ३ हजार कोटी मिळवण्याचे उदिष्ट देण्यात आले आहे. मात्र विभागाने पहिल्या तीन महिन्यात अर्धी लढाई जिंकली आहे. विशेष म्हणजे पुणेकर मिळकत धारकांना ४० टक्के सवलत देऊन देखील एवढे उत्पन्न मिळवले आहे. अशी माहिती विभागाचे उपायुक्त अविनाश सपकाळ यांनी दिली. (Pune Municipal Corporation Property tax Department)

उपायुक्त सपकाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील वर्षी पहिल्या तीन महिन्यात १४८६ कोटी उत्पन्न मिळाले होते. या वर्षी हे उत्पन्न २० कोटी इतके अधिक आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी ४० सवलत दिली जात नव्हती. त्याचे महापालिकेला ९० कोटी मिळाले होते. मात्र या वर्षी १ लाख मिळकत धारकांना ४० टक्के सवलत दिली आहे. असे असून देखील विभागाने पहिल्या तीन महिन्यात एवढे उत्पन्न मिळवले आहे. तसेच सद्यस्थितीत आमच्याकडे बरेचसे कर्मचारी नवीन आहेत. नुकतेच बदली होऊन ते खात्यात दाखल झाले आहेत. असे असून देखील आमच्या खात्याने ही कामगिरी केली आहे.

सपकाळ यांनी पुढे सांगितले कि, खात्याने या आर्थिक वर्षात २५०० ते ३ हजार कोटी उत्पन्न मिळवण्याचे उदिष्ट ठेवले आहे. त्यानुसार आम्ही नियोजन केले आहे, दरम्यान पहिल्या तीन महिन्यात आमचे ५० टक्के टार्गेट पूर्ण झाले आहे. उर्वरित ५० टक्के काम करण्यासाठी आमच्या कडे अजून ९ महिने आहेत. त्यानुसार आम्ही कर्मचाऱ्यांना दोन उदिष्ट दिलेले आहे. त्यानुसार नवीन १ लाख मिळकतींची आकारणी करण्याचे काम देण्यात आले आहे. तर पूर्ण वर्षाची वसुली हि ३ हजार कोटी करण्याचे उदिष्ट दिले आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांना विविध क्षेत्रानुसार विविध उदिष्ट देण्यात आले आहेत. लवकरच वसुलीची मोहीम तीव्र केली जाणार आहे. असे उपायुक्त सपकाळ यांनी सांगितले.


तीन महिन्यात जवळपास १९ हजार नवीन मिळकतींचे मूल्यमापन

उपायुक्त सपकाळ यांनी सांगितले कि, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात विभागाने जवळपास १९ हजार नवीन मिळकतींचे मूल्यमापन केले आहे. त्यातून पालिकेच्या तिजोरीत १५० कोटी जमा झाले आहेत. मागील वर्षी पहिल्या तीन महिन्यात १२ हजार मिळकतींचे मूल्यमापन करण्यात आले होते. त्यांतून पालिकेला ६६ कोटी मिळाले होते. मात्र यंदा पालिकेने मजल मारली आहे. सपकाळ यांनी पुढे सांगितले कि, विभागाचे हे काम नक्कीच आश्वासक आहे. आम्ही अजून जोमाने काम करणार आहोत.

 

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: