Pune Property tax Department | पुणे महापालिका आयपीसी कलम १३८ चा करणार वापर | जाणून घ्या कुणा विरुद्ध वापरले जाते कलम आणि शिक्षा!

Pune Municipal Corporation Building

Homeadministrative

Pune Property tax Department | पुणे महापालिका आयपीसी कलम १३८ चा करणार वापर | जाणून घ्या कुणा विरुद्ध वापरले जाते कलम आणि शिक्षा!

Ganesh Kumar Mule Aug 09, 2024 8:53 PM

 PT-3 application deadline extended till 15th August |  PMC took important decisions regarding 40% discount
PMC PT – 3 Application – PT-3 अर्ज भरण्याची मुदत 15 ऑगस्ट पर्यंत वाढवली | 40% सवलतीबाबत महापालिकेने घेतले महत्वपूर्ण निर्णय | जाणून घ्या 
Pune Property Tax | मिळकतकरामधून पुणे महापालिकेला 1068 कोटींचे उत्पन्न 

Pune Property tax Department | पुणे महापालिका आयपीसी कलम १३८ चा करणार वापर | जाणून घ्या कुणा विरुद्ध वापरले जाते कलम आणि शिक्षा!

 

PMC Property Tax Department – (The Karbhari News Service)  – मिळकतकराचा (Pune Property tax) धनादेश न वटलेल्या मिळकतधारकावर कलम १३८ अन्वये नोटीस बजावणेची कारवाई पुणे महापालिकेच्या मिळकतकर विभागाच्या वतीने उद्यापासून केली जाणार आहे. अशी माहिती उपायुक्त माधव जगताप (Madhav Jagtap PMC) यांनी दिली. (Pune Municipal Corporation Property Tax Department)

चेक बाऊन्स होणे हा दंडनीय गुन्हा मानला जातो.  आणि असे झाल्यास दंड आणि २ वर्षे कारावास अशा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे.  त्याच्याविरुद्ध कलम १३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येतो.   चेक बाऊन्स हा न्यायालयाच्या भाषेत कायदेशीर गुन्हा मानला जातो.  यामध्ये 1881 च्या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट अंतर्गत शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. (Check Bounce)

चेक बाऊन्स झाल्यानंतर काय होते?

चेक बाऊन्स झाल्यावर चेक देणाऱ्या व्यक्तीला त्याची माहिती द्यावी लागते.  त्यानंतर त्याला 1 महिन्याच्या आत तुम्हाला पैसे द्यावे लागतील.  तसे न केल्यास त्या व्यक्तीला कायदेशीर नोटीस पाठवली जाते.  त्यानंतरही १५ दिवस उत्तर न दिल्यास निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्ट १८८१ च्या कलम १३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.  निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अॅक्ट, 1881 अंतर्गत, व्यक्तीवर कारवाई केली जाऊ शकते आणि चेक काढणाऱ्याला दोन वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.

 

१४७ इतक्या मिळकतीना कलम १३८ अन्वये नोटीस

कर आकारणी व कर संकलन विभाग हा पुणे महानगरपालिकेचा उत्पन्नाचा महत्वाचा स्त्रोत असून, २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी कर आकारणी व कर संकलन खात्यास देण्यात आलेल्या उद्दिष्ट पूर्ततेसाठी मोठ्या प्रमाणात थकीत मिळकतधारकांवर कारवाई करण्यात येत आहे. ज्या मिळकतधारकांनी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात कराचा भरणा धनादेशाद्वारे केला आहे, परंतु सदर धनादेश बँकेत वटले नाहीत, अशा मिळकतधारकांवर पुणे महानगरपालिकेकडून उद्या पासून कलम १३८ अन्वये कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे.

०१/०४/२०२४ ते ३१/०७/२०२४ अखेर एकूण १,९६८  धनादेशाची रक्कम रु.८,३३,९३,८४३/- असून, त्यापैकी न वटलेले १,२९२ धनादेशाची रक्कम रु.४,५७,३५,३१७ इतकी रक्कम वसूल करण्यात आली आहे. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील एकूण १४७ इतक्या मिळकतीना कलम १३८ अन्वये नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या मिळकतींची थकबाकीची अंदाजे रक्कम  २.३९ कोटी इतकी आहे. या मिळकतधारकांवर दावा दाखल करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. असे माधव जगताप यांनी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0