Pune Property Tax | मिळकतकर भरण्यासाठी नागरी सुविधा केंद्र सुट्टी दिवशी देखील सुरु राहणार | महापालिका मिळकत कर विभागाची माहिती 

Homeadministrative

Pune Property Tax | मिळकतकर भरण्यासाठी नागरी सुविधा केंद्र सुट्टी दिवशी देखील सुरु राहणार | महापालिका मिळकत कर विभागाची माहिती 

Ganesh Kumar Mule Mar 21, 2026 8:22 PM

Rain | Dams | धरण क्षेत्रातील जोरदार पावसाने पाणीसाठ्यात वाढ 
Recruitment | महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती
PMC Garden Department | अवघ्या 5 रुपयात पुणे महापालिकेकडून घ्या स्थानिक जातीची रोपे

Pune Property Tax | मिळकतकर भरण्यासाठी नागरी सुविधा केंद्र सुट्टी दिवशी देखील सुरु राहणार | महापालिका मिळकत कर विभागाची माहिती

 

PMC CFC Centers – (The Karbhari News Service) – मिळकतकराचा भरणा करण्यासाठी पुणे महानगरपालिका अंतर्गत नागरी सुविधा केंद्र (CFC) ३१ मार्च  पर्यंत साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील सुरु असणार आहेत. अशी माहिती उपायुक्त रवी पवार यांनी दिली. (Pune PMC News)

पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांना मिळकतकर भरणा करणे सुकर व्हावे यास्तव विविध क्षेत्रिय कार्यालय व संपर्क कार्यालयांतर्गत नागरी सुविधा केंद्र (CFC) चालू करण्यात आले आहे. सन २०२५-२६ हे आर्थिक वर्ष ३१ मार्च  रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे वर्ष अखेरीस मिळकतकर भरणा करावयास नागरिकांची गर्दी होते.

मिळकतकराचा भरणा करणे नागरिकांना सोयीस्कर होणेकामी पुणे महानगरपालिका अंतर्गत सर्व नागरी सुविधा केंद्र (CFC) संपर्क कार्यालये  ३१ मार्च २०२६ पर्यंत साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील सुरु ठेवण्यात येणार आहे.

नागरी सुविधा केंद्र (CFC) दि. २९ मार्च २०२६ पर्यंत स. ९.४५ ते सां. ४.०० वा. पर्यंत सुरु रहाणार आहेत व दि. ३० व ३१ मार्च २०२६ रोजी स. ९.४५ ते रा. ८.०० वा. पर्यंत सुरु रहाणार आहेत.

तरी ज्यांनी मिळकतकराचा भरणा अद्यापपर्यंत केलेला नाही त्यांना आवाहन करण्यात येते की, विहित मुदतीत मिळकतकराचा भरणा करून सहकार्य करावे अन्यथा कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत नियमोचित कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे आवाहन मिळकत कर विभागाने केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: