Pune Property Tax | डिसेंबर महिन्यात आतापर्यंत ४० कोटींचा मिळकत कर जमा | चालू आर्थिक वर्षात विभागाने वसूल केला १८४१ कोटींचा महसूल

Homeadministrative

Pune Property Tax | डिसेंबर महिन्यात आतापर्यंत ४० कोटींचा मिळकत कर जमा | चालू आर्थिक वर्षात विभागाने वसूल केला १८४१ कोटींचा महसूल

Ganesh Kumar Mule Dec 19, 2024 9:06 PM

Pune Property tax | सिंहगड टेक्नीकल इन्स्टिट्यूटवर मिळकतकर विभागाची जप्तीची कारवाई | ४७ कोटींची थकबाकी
Pune Properties Survey | | PT 3 Application | मिळकतकर विभागाने पूर्ण केला साडेचार लाख मिळकतींचा सर्व्हे! | सह्यांचे अधिकार आता सहाय्यक आयुक्तांना!
Pune Properties Survey | | PT 3 Application |  नागरिकांचा विरोध सहन करूनही सव्वा तीन लाख मिळकतींचा सर्व्हे!  | १४ ऑगस्ट पर्यंत सर्व्हे संपवणार

Pune Property Tax | डिसेंबर महिन्यात आतापर्यंत ४० कोटींचा मिळकत कर जमा | चालू आर्थिक वर्षात विभागाने वसूल केला १८४१ कोटींचा महसूल

 

PMC Property Tax Department – (The Karbhari News Service) – कर आकारणी व कर संकलन खात्याने सन २०२४-२५ चे उद्दिष्ट पूर्ततेच्या अनुषंगाने थकबाकी वसुली मध्ये मोठ्या प्रमाणात लक्ष्य केंद्रित केलेले आहे. त्या अनुषंगाने २ डिसेंबर पासून मिळकत कर वसुलीसाठी बँड पथकाचा समावेश असलेले स्वतंत्र वसुली पथके तयार करण्यात आलेली आहेत. अशी माहिती उपायुक्त माधव जगताप यांनी दिली. (Pune Municipal Corporation- PMC)

या पथकामार्फत १५ क्षेत्रिय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील थकबाकी असलेल्या मिळकतीवर थकबाकी वसुलीची कारवाई हाती घेण्यात आलेली आहे. त्यानुसार पहिल्या दहा दिवसांच्या काळामध्ये बँड पथकाद्वारे व मध्यवर्ती पथकाद्वारे ३१७ इतक्या मिळकतींना भेट देण्यात येवून, रक्कम ४०,६८,५४,२९९/- (चाळीस कोटी अडूसष्ठ लाख चोपन्न हजार दोनशे नव्याण्णव फक्त) इतक्या रकमेचा कर वसुल करण्यात आलेला आहे. तसेच ७५ इतक्या मिळकती सीलबंद करण्यात आलेल्या आहेत. (Pune PMC News)

पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात सुमारे १४ लाख ८० हजार मिळकती असून, त्यापैकी सुमारे ८,८४,६२२ मिळकत धारकांनी त्यांचा मिळकत कर रक्कम रु. १८४१.७७ कोटी इतका जमा केलेला आहे. उर्वरित मिळकतकर थकबाकी धारकांकडे या पुढील कालावधी मध्ये मोठ्या प्रमाणात थकबाकी वसुली करण्यासाठी पथकांमार्फत मिळकत कर वसुलीचे काम करण्यात येत आहे. तरी ज्या मिळकत धारकांनी अद्यापही कराचा भरणा केलेला नाही, त्यांचेवर कारवाई केली जाणार आहे. असा इशारा मिळकत कर विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0