Pune Property Tax | मिळकतकरामधून पुणे महापालिकेला 1330 कोटींचे उत्पन्न | 68% लोकांनी ऑनलाईन पद्धतीचा केला उपयोग
PMC Pune Property Tax – (The Karbhari News Service) – प्रॉपर्टी टॅक्स मधून पुणे महापालिकेला 17 जून पर्यंत सुमारे 1330 कोटीं 65 लाख उत्पन्न प्राप्त झाले आहे. यामध्ये सर्वाधिक भरणा हा ऑनलाईन पद्धतीने म्हणजे 61% इतका झाला आहे. अशी माहिती महापालिका मिळकतकर विभागाच्या वतीने देण्यात आली. (Pune Municipal Corporation Property tax Department)
पुणे महापालिकेकडून वसुलीवर भर देण्यात आला आहे. त्यानुसार एप्रिल म्हणजेच आर्थिक वर्ष सुरु झाल्यापासूनच वसुली सुरु झाली होती. पहिल्या दिन महिन्यात म्हणजे एप्रिल आणि मे महिन्यात मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांना 5-10% सूट दिली जाते. ही मुदत 15 जून पर्यंत वाढवून देण्यात आली होती. ही मुदत आता संपली आहे. दरम्यान 17 जून पर्यंत महापालिकेला 1130 कोटी 65 लाख एवढे उत्पन्न प्राप्त झाले आहे. 17 जून या दिवशी 1 कोटी 93 लाख मिळाले आहेत. (Pune Municipal Corporation (PMC)
| 15 जून पर्यंत देण्यात आली होती मुदतवाढ
दरम्यान आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या दोन महिन्यात म्हणजे एप्रिल आणि मे महिन्याच्या अखेरपर्यंत मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांना मिळकतकराच्या सर्वसाधारण करामध्ये ५% व १०% इतकी सवलत दिली जाते. नागरिकांकडून मुदतवाढ देण्यासाठी सातत्याने मागणी केली जात होती. त्यानुसार नागरिकांना 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र आता ही मुदत आता संपली आहे.
| 7 लाख 31 हजार 342 लोकांनी केला मिळकत कराचा भरणा
17 जून पर्यंत पुणे महापालिकेकडे 7 लाख 31 हजार 342 लोकांनी केला मिळकत कराचा भरणा केला आहे. अजून जवळपास 5 लाख असे लोक आहेत, ज्यांनी कर भरलेला नाही. त्यामुळे विभागाला अपेक्षा आहे 2800 कोटी पर्यंत महसूल मिळेल. दरम्यान ऑनलाईन पद्धतीने करभरणा करण्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. 68% लोकांनी म्हणजे 4 लाख 94 हजार 694 लोकांनी 808 कोटी जमा केले आहेत. म्हणजे एकूण रकमेच्या 61% हिस्सा हा ऑनलाईन रकमेचा आहे.