Pune Property Survey | मिळकतकर विभागाने सुरु केला शहरातील मिळकतींचा सर्वे!
| जास्तीत जास्त मिळकतीची कर आकारणी करण्याचा प्रयत्न
Pune Property Survey – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या मिळकतकर विभागाने (PMC Property tax Department) चालू आर्थिक वर्षात जास्तीत जास्त वसुली करण्यासाठी सुरुवाती पासूनच प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विभागाने शहरातील मिळकतीचा सर्वे (Pune Property Survey) सुरु केला आहे. याबाबत पेठ निरीक्षकासोबत नुकतीच बैठक त्यांना उद्दिष्ट देण्यात आले आहे. अशी माहिती कर आकारणी व कर संकलन विभागाचे उपायुक्त माधव जगताप (Madhav Jagtap PMC) यांनी दिली. (Pune Property tax)
मिळकतकर विभागाने मागील आर्थिक वर्षात 2273 कोटींचे उत्पन्न मिळवले आहे. तर चालू वर्षात विभागाने 3200 कोटी महसूल मिळवण्याचे उद्दिष्ट्य समोर ठेवले आहे. त्यानुसार विभागाने आतापासूनच प्रयत्न सुरु केले आहेत.
याबाबत जगताप यांनी सांगितले कि नुकतीच पेठ निरीक्षक (SI) यांच्यासोबत बैठक घेतली. यात त्यांना सूचित करण्यात आले कि शहरातील सर्व मिळकतीचा सर्वे करण्यात यावा. प्रत्येक निरीक्षकाने एका आठवड्यात 25 मिळकतीचा सर्वे करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. यात प्रॉपर्टी ची नोंदणी नसेल तर ती करून घेणे, मिळकतीची कर आकारणी करणे, दुबार नाव असेल तर ते काढून टाकणे, PT3 अर्ज भरून घेणे, अशा गोष्टी करायच्या आहेत. त्याची सुरुवात आजपासूनच करण्यात आली आहे. जगताप यांनी सांगितले कि यामुळे महापालिकेच्या महसुलात वाढ होणार आहे. तसेच मिळकती देखील आकारणीत येणार आहेत.