Pune Properties Survey | | PT 3 Application | मिळकतकर विभागाने पूर्ण केला साडेचार लाख मिळकतींचा सर्व्हे! | सह्यांचे अधिकार आता सहाय्यक आयुक्तांना!

PMC Building

Homeadministrative

Pune Properties Survey | | PT 3 Application | मिळकतकर विभागाने पूर्ण केला साडेचार लाख मिळकतींचा सर्व्हे! | सह्यांचे अधिकार आता सहाय्यक आयुक्तांना!

Ganesh Kumar Mule Aug 17, 2024 9:54 PM

PMC 32 Villages property tax | ३२ समाविष्ट गावातील नागरिकांना दिलासा | मात्र महापालिकेला हक्काच्या उत्पन्नावर सोडावे लागणार पाणी | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय
Pune Property Tax | आगामी आर्थिक वर्षात पुणेकरांवर कुठलीही करवाढ नाही | महापालिका प्रशासनाचा निर्णय
Pune Property Tax | मिळकत कर वसुलीसाठी दामिनी महिलांची 12 पथके | कर वसुलीसाठी पहिल्यांदाच महिलांना जबाबदारी 

Pune Properties Survey | | PT 3 Application | मिळकतकर विभागाने पूर्ण केला साडेचार लाख मिळकतींचा सर्व्हे! | सह्यांचे अधिकार आता सहाय्यक आयुक्तांना!

 

PMC Property tax Department- (The Karbhari News Service) – पुणे शहरातील स्व-वापराच्या निवासी मिळकतींना मिळकत करात 40% सवलतीच्या अनुषंगाने पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation (PMC) मिळकतीची तपासणी मोहीम सुरु करण्यात आला होता. सुमारे साडे चार लाख मिळकतींचा सर्वे केला जाणार होता. त्यानुसार हा सर्वे १४ ऑगस्ट ला पूर्ण करण्यात आला आहे. दीड ते दोन महिन्यात हा सर्वे पूर्ण करण्यात आला आहे. अशी माहिती उपायुक्त माधव जगताप यांनी दिली. (Pune Property Tax)

2024-25 या आर्थिक वर्षातील देयके वितरीत केल्यानंतर PT-3 फॉर्म भरण्याची मुदत वाढविण्याबाबत मोठ्या प्रमाणात नागरिक, सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधी मागणी करीत होते. अशा 3,72,440 मिळकतींचा सर्व्हे पुणे महानगरपालिकेच्या सेवकांकडून प्रत्यक्ष जागेवर जाऊन सर्व्हे करण्याचे काम 20 जून पासून चालू केले होते.

पुणे महापालिका पूर्ण शहरभर ही तपासणी मोहीम राबवत होती. यात नागरिकांकडून तात्काळ PT 3 भरून घेण्यात येणार आहे. घरात स्वतः राहत असल्यासच मिळकतधारकाला सवलत मिळणार आहे. नागरिकांसाठी ही शेवटची सवलत असणार आहे. यानंतर PT 3 form भरण्याची संधी दिली जाणार नाही. मिळकतींची संख्या मोठी असल्याने आणि महिनाभरात हे काम पूर्ण करायचे उद्दीष्ट ठेवल्याने मिळकत कर विभागाला अतिरिक्त मनुष्यबळाची गरज होती. जवळपास ४०० कर्मचाऱ्यांनी हे काम पूर्ण केले आहे. दरम्यान यात नवीन ५० हजार मिळकती देखील सापडल्या आहेत. त्यांचे देखील पीटी ३ अर्ज भरून घेण्यात आले आहेत.

– —-

सर्व्हे केलेल्या एकूण मिळकतींची संख्या – 449026

भाडेकरू (Rented) – 117721
मालक (Owner) – 231663
बंद असलेल्या (Vacant) – 55106
—-

दरम्यान या संबंधीच्या निवेदनावर आता उपयुक्तांचे अधिकाराचे विकेंद्रीकरण केले जाणार आहे. हे अधिकार सहाय्यक आयुक्त यांना दिले जाणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव महापालिका आयुक्त यांच्यासमोर मजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

– दरमहा २५०-३०० कोटी वसूल करण्याचे आदेश

दरम्यान विभाग आता मिळकतकर वसुलीवर जोर देणार आहे, असे उपायुक्त जगताप यांनी सांगितले. जगताप पुढे म्हणाले, बैंड पथक, तसेच क्षेत्रीय कार्यालय स्तरावर वसुली टीम तयार करुन जास्तीत जास्त वसुली केली जाणार आहे. महिन्याला २५०-३०० कोटी वसूल करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. नवीन मिळकती शोधण्या सोबत त्यांचे मूल्यमापन देखील केले जाणार आहे. तसेच लोकांना त्यांच्या थकबाकीची माहिती देण्यासाठी प्रसार माध्यमातून बातम्या दिल्या जाणार आहेत. शिवाय लोकांना कॉल करुन, एसएमएस करुन देखील थकबाकीची माहिती दिली जाणार आहे, असेही जगताप यांनी सांगितले.