Pune Politics | मंचावर बसलेले अनेक चेहरे लवकरच मंत्रालयात जाणार | सुप्रिया सुळे यांच्या या विधानाने पर्वती विधानसभे साठी इच्छुक उमेदवारांना मिळाले बळ!

MP Surpiya Sule And Aba Bagul

HomeBreaking News

Pune Politics | मंचावर बसलेले अनेक चेहरे लवकरच मंत्रालयात जाणार | सुप्रिया सुळे यांच्या या विधानाने पर्वती विधानसभे साठी इच्छुक उमेदवारांना मिळाले बळ!

Ganesh Kumar Mule Aug 21, 2024 8:56 PM

PMC : Aba Bagul : महानगरपालिकेतर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांच्या मानधनाचा मार्ग मोकळा : कॉंग्रेस गटनेते  आबा बागुल यांची माहिती 
Akshay tritiya : श्री लक्ष्मी माता उत्सवानिमित्त मंदिरात फळांची आरास
Pune Municipal Corporation | डीपी नुसार पुणे शहरात रस्त्यांचे रुंदीकरण तातडीने करण्याची मागणी 

Pune Politics | मंचावर बसलेले अनेक चेहरे लवकरच मंत्रालयात जाणार | सुप्रिया सुळे यांच्या या विधानाने पर्वती विधानसभे साठी इच्छुक उमेदवारांना मिळाले बळ!

 

Supriya Sule – (The Karbhari News Service) – राजीव गांधी इ लर्निंग (PMC Rajiv Gandhi E Learning School) ही आदर्श शाळा असून अश्या देशातील सर्व सरकारी शाळा अश्या झाल्या पाहिजेत. संविधानाने दिलेले आपले हक्क व कर्तव्य याची जाण शिक्षण अवस्थेत असतना विद्यार्थ्यांना व्हावी. तसेच मातृभाषेबद्दल जिव्हाळा वाढवा याकरिता आमचे सरकार येताच याचा अभ्यास अनिवार्य करणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी सांगितले. त्याचवेळी आबा बागुल (Aba Bagul) यांच्याकडे पाहत मंचावर बसलेले अनेक चेहरे लवकरच मंत्रालयात जाणार असल्याचे उदगार त्यांनी काढले. यामुळे बागुल यांना पर्वती विधान सभेसाठी संधी मिळेल. अशी चर्चा केली जात आहे.

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी दिशादर्शक ठरलेल्या व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व पुण्याचे माजी उपमहापौरआबा बागुल यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून सहकारनगरमध्ये पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारलेल्या देशातील संगणक क्रांतीचे प्रणेते, माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी ई- लर्निंग स्कुलला १३ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित विशेष सोहळ्यात खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर माजी सनदी अधिकारी महेश झगडे, माजी आमदार उल्हास पवार, राष्ट्रवादी श प गटाचे अध्यक्ष प्रशांत जगताप, पुणे शहर कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष अरविंद शिंदे, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, अंकुश काकडे, कमलताई व्यवहारे अभय छाजेड, रामचंद्र उर्फ चंदू कदम,अविनाश बागवे, मुख्तार शेख,जयंत किराड,सौरभ अमराळे, जयश्रीताई बागुल,शिक्षांधिकारी आशा उबाळे, प्रिन्सिपल जामुवंत मसलकर,रुपाली कदम,अश्विनी ताटे आदी उपस्थित होते.

यावेळी खासदार सुळे म्हणाल्या कि, राजीव गांधी इ लर्निंग ही महानगरपालिकेची आदर्श शाळा आहे. समाजात वावरत असताना समता प्रस्थापित करण्यासाठी शिक्षणाची गरज असते या शाळेतील विद्यार्थी नासामध्ये काम करत आहेत ही अभिमानाची बाब आहे. चांगले लोकप्रतिनिधी व सनदी अधिकारी यांनी एकत्र काम केल्यावर अश्या प्रकारची चांगली वस्तू तयार होते याचे मूर्तिमंत उदाहरण ही शाळा आहे. महाविकास आघाडीचे सरकार लवकरच येणार आहे.

व अश्या प्रकारच्या शाळा शाळा संपूर्ण राज्यात करण्याचे काम आम्ही करू. नुकत्याच बदलापूर व पुण्यात झालेल्या घटनेचा निषेध करून मुलींसह मुलांनाही गुड टच व बॅड टच शिकवला पाहिजे स्त्रीचा सन्मान करण्यास लहानपणापासूनच देले पाहिजे आणि अश्या सामाजिक प्रश्नासाठी सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर असून त्याची ही ओळख पुसत आहे आपण पुढच्या पिढीला चांगले संस्कार देऊ शकलो नाही तर ही पिढी आपल्याला माफ करणार नाही. ही विस्कटलेली घडी नीट करण्याची जबाबदारी ही आबा बागुल यांच्या सारख्या लोकप्रतिनिधीची आहे. असे त्या म्हणाल्या.

माजी सनदी अधिकारी महेश झगडे मार्गदर्शन करताना म्हणाले की आबा बागुलांनी दिलेला प्रस्ताव हा आउट ऑफ द बॉक्स होता आबांची कामे ही समाजाच्या दृष्टीने उपयोगी असतात त्यातून नागरिकांना फायदा होतो. शिक्षण आणि आरोग्य यामध्ये खासगीकरण नसावे ते सामाजिकदृष्ट्या घातक असते. अश्या शाळा सर्व देशात झाल्या पाहिजे व खासगी शाळेतील मुले ही सरकारी शाळेकडे वळली पाहिजे शिक्षण आणि आरोग्य यातील सुरु असलेले विद्रुपीकरण रोखण्यासाठी सुप्रियाताई यांनी पुढाकार घेतला पाहजे.

माजी आमदार उल्हास पवार म्हणाले, अनेक लोकांना विश्वास वाटत नव्हता की येथे अश्याप्रकारे शाळा उभी होईल जे अशक्य होते ते आबांनी शक्य करून दाखवले शाळेतील विद्यार्थी माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्याशी संवाद साधताना पाहून या शाळेच्या माद्यमातून राजीव गांधी यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम सुरु आहे असेही ते म्हणाले.

प्रास्ताविकात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आबा बागुल यांनी प्रारंभी खासदार सुप्रिया सुळे यांचा महाराष्ट्राची आयर्न लेडी अशा शब्दात गौरव केला. सत्तेच्या लोभात होणाऱ्या षडयंत्राला कणखरपणे सामोरे जात त्यांनी वडिलांना दिलेली भक्कम साथ आज उभ्या महाराष्ट्राला प्रेरणादायी आहे. स्त्री किती भक्कम आणि सक्षम असते याचा हा दाखला आहे.जशा भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी या कणखर होत्या.त्यामुळेच त्यांना भारताच्या आयर्न लेडी म्हणून ओळखले जाते. तसे खासदार सुप्रिया सुळे याही महाराष्ट्राच्या आर्यन लेडी आहेत आणि त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हाव्यात अशी सदिच्छाही आबा बागुल यांनी व्यक्त केली.

स्व. राजीव गांधी ई- लर्निंग स्कूल बद्दल बोलताना आबा बागुल म्हणाले, आज गरीब वर्गातील , तळागाळातील विद्यार्थ्यांच्या सक्षम भविष्यासाठी ही स्व. राजीव गांधी ई- लर्निंग स्कुल दिशादर्शक ठरली आहे. शिवाय श्रीमंत – गरीब याला छेद देत सर्वसमावेशकही झाली आहे. सर्वच परीक्षांच्या निकालांमध्ये शंभर टक्क्यांची परंपरा कायम राखत गुणवत्तेचा जल्लोष सदैव होत आहे.त्यामुळेच आज सर्वच स्तरातून या शाळेत प्रवेशासाठी आग्रह होत आहे. विशेष म्हणजे विविध क्षेत्रात विद्यार्थी यशस्वी पदार्पण करत आहेत. केवळ दहावी -बारावीमध्येच नाही तर आयआयटीमध्येही या शाळेतील विद्यार्थी टॉपर ठरले आहेत. अभिमानास्पद बाब अशी की, कुणी आयपीएस अधिकारी तर कुणी इंजिनिअर अशा विविध क्षेत्रात आज कार्यरत आहेत. दहावी -बारावी आणि अन्य परीक्षांच्या निकालांमध्ये सातत्याने शंभर टक्क्यांची परंपरा कायम राखणाऱ्या या स्कुलमधील ५०० विद्यार्थ्यांनी आयआयटीमध्ये तर जेईईमध्ये १००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. अगदी ‘नासा’साठी दोन विद्यार्थीही पात्र ठरले आहेत .खऱ्या अर्थाने हा गुणवत्तेचा आणि आदर्शवत वाटचालीचा जल्लोष आहे.असेही ते म्हणाले.

आज हे व्यासपीठ राजकीय नाही ;पण समाजकारणातून राजकारणात प्रभावी कार्य करणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीला यंदा पर्वती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली पाहिजे,ती संधी आता दिलीच पाहिजे.त्यासाठी हा मतदारसंघ महाविकास आघाडीत काँग्रेसला दिल्यास प्रस्थापितांचा पराभव निश्चित होईल आणि आघाडीच्या विजयी उमेदवारांच्या संख्येत एक आमदार या मतदारसंघातून वाढेल याची मी खात्री देतो.त्यामुळे खासदार सुप्रियाताई सुळे यांना विनंती आहे की,त्यांनी स्वतः लक्ष घालावे. पवारसाहेबांशी बोलावे आणि माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला न्याय द्यावा. असेही आबा बागुल म्हणाले.

यंदा ‘पर्वती’ काँग्रेसला द्या,’आबां’ना आमदार करा!

यावेळी सभागृहात पर्वती ब्लॉक काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी -कार्यकर्त्यांसह नागरिकांनी यंदा पर्वती विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला द्या आणि आबा बागुल यांना आमदार करा अशा जोरदार घोषणा देत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. भाजपला पराभूत करायचे असेल,प्रस्थापितांना घरी पाठवायचे असेल तर आबा बागुल यांच्याशिवाय या मतदारसंघात पर्याय नाही. त्यामुळे आता ‘आबां’ना आमदार करा अशी एकमुखी मागणी सर्वांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर केली.त्याला उपस्थितांनीही दाद दिली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0