Pune PMC News | पुण्यात ७४ कोटींचा कचरा प्रकल्प: हडपसर रामटेकडीत उभारणार ७५ MTPD ड्राय वेस्ट प्लांट

Homeadministrative

Pune PMC News | पुण्यात ७४ कोटींचा कचरा प्रकल्प: हडपसर रामटेकडीत उभारणार ७५ MTPD ड्राय वेस्ट प्लांट

Ganesh Kumar Mule Sep 02, 2026 12:45 PM

Encroachment action PMRDA Pune | नऊ द‍िवसात तब्बल दोन हजार अतिक्रमणे काढली
Raj Thackeray | जिंकण्यासाठीच्या लढाईला तयार रहा | राज ठाकरे यांचे पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांना आदेश
CSR | Pune Municipal Corporation | CSR  माध्यमातून कोविड काळात  पुणे महापालिकेला दिलेली ७ कोटीची देणगी विना वापर पडून!

Pune PMC News | पुण्यात ७४ कोटींचा कचरा प्रकल्प: हडपसर रामटेकडीत उभारणार ७५ MTPD ड्राय वेस्ट प्लांट

ग्रीन पृथ्वी कंपनीला २० वर्षांसाठी कंत्राट

 

PMC Standing Committee – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचा एक मोठा प्रस्ताव समोर आला आहे. शहरातील सुक्या कचऱ्यावरील, विशेषतः कापड, चिध्या, होजिअरी, फर्निचर आणि लाकडाच्या कचऱ्यावरील प्रक्रिया करण्यासाठी हडपसर रामटेकडी येथे *७५ MTPD क्षमतेचा Dry Waste Processing Plant* उभारण्यात येणार आहे. यासाठी तब्बल *७४ कोटी ६ लाख ८६ हजार १९६ रुपये* इतका खर्च अपेक्षित आहे. हा प्रस्ताव स्थायी समिती च्या माध्यमातून मुख्य सभेसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. (PMC Solid Waste Management Department)

झोन २ मध्ये, मौजे हडपसर येथील फायनल प्लॉट नंबर १०४, रामटेकडी औद्योगिक वसाहत येथील टी. पी. स्कीममधील सुमारे ११ एकर एम. पी. आरक्षित जागेपैकी दक्षिणेकडील १ एकर जागेमध्ये हा प्रकल्प उभारण्यात येईल.

बी-२ पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. या कामासाठी मे. *ग्रीन पृथ्वी सोल्युशन्स एलएलपी, पुणे* या कंपनीची निवड करण्यात आली आहे. कंपनीने सुरुवातीला प्रकल्प उभारणीसाठी रु. १३,०३,७५,०००/- इतकी रक्कम सांगितली होती.

परंतु आयुक्तांनी यंत्रसामग्रीचा खर्च (Machinery Capex) कंत्राटदाराने तर स्थापत्य विषयक खर्च (Civil Capex) महापालिकेने करण्याची सूचना दिल्यानंतर सुधारित प्रस्ताव मागवण्यात आला.

सुधारित प्रस्तावानुसार, प्रकल्प उभारणीसाठी २० वर्षे कालावधीसाठी, देखभाल दुरुस्तीकरिता *प्रति मे. टन रु. ६६०/-* व त्यावर *७% वार्षिक दरवाढ* प्रमाणे मोबदला देण्यात येणार आहे.

७४ कोटींचा एकूण खर्च:*
या दराने पुढील २० वर्षात महापालिकेवर एकूण *रु. ७४,०६,८६,१९६.२५ (चौऱ्याहत्तर कोटी सहा लक्ष शहाण्णव हजार एकशे शहाण्णव रुपये पंचवीस पैसे फक्त) – जीएसटी सह* इतके आर्थिक दायित्व निर्माण होणार आहे.

आयुक्तांच्या पत्रात आर्थिक वर्ष निहाय तरतूदही दिली आहे. २०२७-२८ साठी १.८० कोटींपासून सुरुवात होऊन, २०४६-४७ मध्ये ही रक्कम ६.५३ कोटींपर्यंत जाणार आहे.

महापालिका अधिनियम कलम ७२ (ब) अन्वये दरवर्षी तरतूद उपलब्ध करणे आवश्यक आहे. या प्रस्तावामध्ये मूळ गुंतवणूक आणि यंत्रणेचा खर्च लक्षात घेता, १५ वर्षांमध्ये प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य होत नसल्याने, प्रकल्पाचा कालावधी १०+५ ऐवजी *२० वर्षे* करणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी नमूद केले आहे. गुंतवणुकीच्या ४०% रक्कम गुंतवणूक लागणार असल्याने हे आवश्यक आहे.

या कामासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची प्रकल्प उभारणी परवानगी (CTE) प्राप्त झाली असून, एप्रिल २०२७ पासून प्रकल्प कार्यरत होणे अपेक्षित आहे. सन २०२६-२७ करिता घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत तरतूद उपलब्ध करून देण्यात येणार असून, कमी पडणारी तरतूद वर्गीकरणाद्वारे उपलब्ध केली जाणार आहे.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: