Pune Congress | राहुल गांधींविरोधातील FIR च्या निषेधार्थ पुणे काँग्रेसचे आंदोलन | भाजप-आरएसएसच्या ‘शुद्धीकरण’ कृत्यावर संताप

HomeBreaking News

Pune Congress | राहुल गांधींविरोधातील FIR च्या निषेधार्थ पुणे काँग्रेसचे आंदोलन | भाजप-आरएसएसच्या ‘शुद्धीकरण’ कृत्यावर संताप

Ganesh Kumar Mule Sep 01, 2026 9:20 PM

PMC Property Tax Department | नियमानुसार ३ वर्षांनी बदली होऊन पुन्हा तेच तेच कर्मचारी प्रॉपर्टी टॅक्स विभागात घेण्याचे प्रयोजन कशासाठी? | माजी आमदार रविंद्र धंगेकर यांचा महापालिका आयुक्तांना सवाल!
Immersion | Sound pollution | Lakshmi Road | विसर्जनाच्या दोन्ही दिवशी लक्ष्मी रस्त्यावरील वातावरण असह्य!  | स्थानिक रहिवाश्यांचे जगणे झाले मुश्किल   | विसर्जनात सरासरी 105.2 डेसिबल आवाज
Social Security | Ganesh Mandal pune| सामाजिक सुरक्षेतेच्यादृष्टीने नवीन कल्पना सुचविण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे गणेश मंडळांना आवाहन

Pune Congress | राहुल गांधींविरोधातील FIR च्या निषेधार्थ पुणे काँग्रेसचे आंदोलन | भाजप-आरएसएसच्या ‘शुद्धीकरण’ कृत्यावर संताप

 

Pune News – (The Karbhari News Service) – काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या हल्दवानी येथील सभास्थळी भाजप-आरएसएस कार्यकर्त्यांनी केलेल्या ‘शुद्धीकरण’ विधीच्या निषेधार्थ आवाज उठवल्याने लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात उत्तराखंड पोलिसांनी दाखल केलेल्या द्वेषपूर्ण FIR च्या निषेधार्थ आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. (Pune Congress Agitation)

पुणे महापालिकेतील काँग्रेस गटनेते *रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम* यांच्या नेतृत्वाखाली बालगंधर्व चौक येथील झाशीची राणी पुतळ्याजवळ हे आंदोलन झाले.

काँग्रेसने दिलेल्या माहितीनुसार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या हल्दवानी येथील सभेनंतर त्या सभास्थळाचे भाजप व आरएसएस कार्यकर्त्यांनी ‘शुद्धीकरण’ केले होते. हा प्रकार अत्यंत निंदनीय असून जातीयवादी मानसिकतेचे प्रतीक असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत ठाम भूमिका घेत दोषींवर कठोर कारवाई करून FIR दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र कारवाई करण्याऐवजी उत्तराखंड पोलिसांनी भाजप प्रणित सरकारच्या दबावाखाली राहुल गांधी यांच्याविरोधातच हल्दवानी शहर कोतवालीत FIR दाखल केला, असा आरोप पुणे काँग्रेसने केला आहे.

 

यावेळी बोलताना गटनेते चंदूशेठ कदम म्हणाले,

“संविधानात अंतर्भूत असलेल्या सामाजिक न्यायाच्या मूल्यांवर हल्ला करणाऱ्यांच्या विरोधात आमचा संघर्ष सुरूच राहील. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला राज्य पुरस्कृत दडपशाहीच्या कारवायांनी घाबरवता येणार नाही. प्रत्येक नागरिकाच्या सामाजिक न्याय, घटनात्मक समानता व प्रतिष्ठेसाठी काँग्रेस पक्ष सातत्याने लढत राहील. खर्गे साहेबांच्या सभेनंतर सभास्थळाचे ‘शुद्धीकरण’ करणे ही जातीयवादी मानसिकतेची पराकाष्ठा आहे. हा केवळ मल्लिकार्जुन खर्गे यांचा अपमान नसून देशातील कोट्यवधी दलित, वंचित आणि शोषित नागरिकांचा अपमान आहे. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार दिलेला असताना जात-पात आणि अस्पृश्यतेच्या मानसिकतेला खतपाणी घालणाऱ्या प्रवृत्तींविरोधात काँग्रेस पक्ष सातत्याने लढा देत राहील.”

या आंदोलनात उत्तराखंडमधील दोषी भाजप कार्यकर्त्यांविरोधात तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली.

या निषेध आंदोलनाला नगरसेवक साहिल केदारी, सुनील शिंदे, दीपाली डोख, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, शहर उपाध्यक्ष कैलास गायकवाड, खजिनदार चंद्रशेखर कपोते, महिला अध्यक्षा स्वाती शिंदे, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे, इंटक अध्यक्ष चेतन अगरवाल, NSUI अध्यक्ष अभिजित गोरे, अनुसूचित विभागाचे अध्यक्ष कुणाल राजगुरू, डॉ. राहुल सावंत, माजी नगरसेविका स्नेहल पाडळे, लता राजगुरू यांच्यासह बाळासाहेब अमराळे, सुरेश नागरे, फैय्याज शेख, घन:श्याम निम्हण, विक्रम खन्ना, हर्षद हांडे, ॲड. योगेश माखणे, प्रियंका रणपिसे, शिवानी माने, ॲड. राजश्री अडसूळ आदींसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

—

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: