Pune PMC News | अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीला जबाबदार कोण? महापालिकेच्या एका सहाय्यक आयुक्तांची खातेनिहाय चौकशी तर एका उपायुक्तांची बदली! | हेचि फल काय मम तपाला!

HomeपुणेBreaking News

Pune PMC News | अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीला जबाबदार कोण? महापालिकेच्या एका सहाय्यक आयुक्तांची खातेनिहाय चौकशी तर एका उपायुक्तांची बदली! | हेचि फल काय मम तपाला!

गणेश मुळे Jul 27, 2024 2:46 PM

Pune Rain | महापालिका प्रशासनाने बाधित कुटुंबांचे पंचनामे लवकर करून त्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी | डॉ. नीलम गोऱ्हे
Dr Rajendra Bhosale IAS | खातेप्रमुखांच्या बैठकीत महापालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांना केल्या कडक सूचना | आपत्कालीन परिस्थितीशी तोंड देण्यास सज्ज राहण्याचे आदेश
Finally, action was taken on the controversial hoarding erected in front of the Pune Municipal Corporation (PMC)!

Pune PMC News | अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीला जबाबदार कोण? महापालिकेच्या एका सहाय्यक आयुक्तांची खातेनिहाय चौकशी तर एका उपायुक्तांची बदली! | हेचि फल काय मम तपाला!

Pune Flood News – (The Karbhari News Service) – पुणे शहरात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचे खापर प्रशासनाकडून फोडण्यात आले आहे. यासाठी काही अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात आले आहे. ते करणे गरजेचे होते. त्यानुसार सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे (Sandip Khalate PMC) यांना दोषी गृहीत धरून त्यांची खातेनिहाय चौकशी लावण्यात आली आहे. चौकशी होईपर्यंत खलाटे यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच परिमंडळ तीन चे उपायुक्त संजय शिंदे (Deputy Commissioner Sanjay Shinde) यांची बदली करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS) यांनी या बाबतचे आदेश नुकतेच जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation (PMC)
एकीकडे संदीप खलाटे यांचे रात्री उशिरापर्यंत काम करत असल्याचे फोटो समाज माध्यमावर वायरल झाले होते. तर दुसरीकडे त्यांची खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली. त्यामुळे नागरिक आणि कर्मचारी संभ्रमात पडले आहेत. परिमंडळ तीन अंतर्गत सिंहगड रोड चा परिसर येतो. त्यामुळे उपायुक्त शिंदे यांना देखील जबाबदार धरून त्यांची बदली करण्यात आली आहे. मात्र त्यांना अजून बदलीचे खाते देण्यात आलेलं नाही. त्यामुळे आपण काम करूनही हेचि फल काय मम तपाला, असा प्रश्न अधिकारी विचारात आहेत.  (Pune Rain News)

संदीप खलाटे यांना का धरले जबाबदार?

प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार महापालिका आयुक्त यांनी २५ जुलै रोजी सिंहगड रोड येथे अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीची पाहणी करणेसाठी समक्ष भेट दिली. त्यावेळी  खलाटे यांनी केलेल्या कामामध्ये कर्तव्यपरायणता दिसून आलेली नाही. तसेच त्यांनी कामाची जबाबदारी योग्य रीतीने पार पाडली नसून ही अशोभनीय गोष्ट केलेली आहे. कर्तव्य पार पाडताना  खलाटे यांनी गुणवत्ता, औचित्य व उत्तरदायित्व ठेवले नसल्याचे निदर्शनास आले आहे. यास्तव संदिप भगवान खलाटे, सहाय्यक आयुक्त, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय, पुणे महानगरपालिका यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ५६ (२) (फ) नुसार अटी शर्तीनुसार मनपा सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

या ठेवण्यात आल्या आहेत अटी

१)  खलाटे यांचेविरुद्धची खातेनिहाय चौकशीची कार्यवाही ( ज्ञापन बजाविणे, सादरकर्ता अधिकारी, साक्षीदार याबाबतची पूर्तता इ.) ही शीघ्रतेने पूर्ण करण्याची दक्षता उप आयुक्त (परिमंडळ क्र. ३) यांनी घ्यावी.
२) आयुक्तांच्या पूर्वपरवानगी शिवाय श्री खलाटे यांना महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र सोडता येणार नाही.
३) श्री. खलाटे यांना मनपा सेवा विनियमाप्रमाणे निर्वाहभत्ता अदा करण्यात यावा.
४) सदर आदेशाची नोंद श्री. खलाटे यांच्या सेवापुस्तकात करण्यात यावी.
दरम्यान महापालिका आयुक्तांनी जून महिन्यात मुसळधार पाऊस झाल्यांनंतर उपयुक्ताना रात्रीची ड्यूटी करण्याचे आदेश दिले होते. पुण्यात जेव्हा पुरस्थिती निर्माण झाली तेव्हा संबंधित रात्रीची ड्यूटी असणाऱ्या उपयुक्तांनी आपले काम चोख केले आहे का, याची देखील चौकशी करण्याची मागणी या निमित्ताने केली जात आहे.