Pune PMC News | नगर रोडवरील शास्त्रीनगर चौकातील वाहतूक कोंडीला लागणार ब्रेक!

Homeadministrative

Pune PMC News | नगर रोडवरील शास्त्रीनगर चौकातील वाहतूक कोंडीला लागणार ब्रेक!

Ganesh Kumar Mule Aug 13, 2026 8:50 PM

Pune PMC News | विमानतळ आणि आसपासच्या परिसरात विमानतळ प्राधिकरण व पुणे महानगरपालिका यांची एकत्रित पाहणी 
 PMC Labour Welfare Department  | कामावर असताना मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या वारसांना २ लाख आणि ५ लाख चे अर्थसहाय्य! | अमल करण्याबाबत प्रशासनाचे परिपत्रक जारी!
Pune Ekta Nagari |एकता नगरीतील पूरजन्य भागाची महापालिका आयुक्तांकडून पाहणी | संरक्षक भिंत व नालेसफाईची कामे गतीने पूर्ण करण्याचे आदेश

Pune PMC News | नगर रोडवरील शास्त्रीनगर चौकातील वाहतूक कोंडीला लागणार ब्रेक!

| मार्च 2027 पर्यंत 750 मीटर ग्रेड सेपरेटर आणि 700 मीटर उड्डाणपूल पूर्ण करण्याचे आयुक्तांचे आदेश

 

Pune Traffic – (The Karbhari News Service)  – पुण्यातील नगर रोडवरील शास्त्रीनगर चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रस्तावित असलेल्या ग्रेड सेपरेटर आणि उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामाला गती देण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आज प्रकल्पस्थळाला भेट देऊन कामाचा आढावा घेतला. संपूर्ण प्रकल्प मार्च 2027 अखेर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांना दिल्या. (Pune News)

सध्या नगर रोडवरून येणारी वाहतूक गोल्फ चौकमार्गे मुंबईच्या दिशेने, तसेच कल्याणीनगर आणि गुंजन चौकाच्या दिशेने जाते. या तिन्ही मार्गांचा मोठा भार शास्त्रीनगर चौकात येत असल्याने सकाळ-संध्याकाळी येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.

या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून महापालिकेने दोन प्रकल्प हाती घेतले आहेत.

प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये
आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार प्रस्तावित कामे पुढीलप्रमाणे आहेत:

1. *ग्रेड सेपरेटर*: आगाखान पॅलेस ते गुंजन चौक या दिशेने सुमारे 750 मीटर लांबीचा 6 पदरी ग्रेड सेपरेटर बांधण्यात येणार आहे.
2. *उड्डाणपूल*: आगाखान पॅलेस ते गोल्फ चौक या दिशेने सुमारे 700 मीटर लांबीचा 4 पदरी उड्डाणपूल प्रस्तावित आहे.

या दोन्ही प्रकल्पांमुळे शास्त्रीनगर चौकातील सिग्नलवरील थांबा कमी होऊन वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

आयुक्तांच्या सूचना काय?
नवल किशोर राम यांनी कामाचा वेग वाढवण्यावर भर दिला.
1. ग्रेड सेपरेटरचे काम पुढील 4 महिन्यांत पूर्ण करण्याचे लक्ष्य दिले.
2. संपूर्ण ग्रेड सेपरेटर आणि उड्डाणपूल प्रकल्प मार्च 2027 अखेर पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
3. कामादरम्यान वाहतूक पोलीस विभागाशी समन्वय ठेवून वाहतुकीची सुरक्षितता आणि पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यास सांगितले.

हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नगर रोड, कल्याणीनगर, गुंजन चौक, गोल्फ चौक तसेच मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. शास्त्रीनगर चौक परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊन प्रवास अधिक सुरक्षित आणि जलद होणार आहे.

या पाहणीवेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, सभासद अश्विनी लांडगे, सभासद अविनाश साळवे, सभासद विशाल मलके, मुख्य अभियंता प्रकल्प विभाग दिनकर गोजारे, मुख्य अभियंता पथ विभाग राजेश बनकर, उपायुक्त परिमंडळ क्र. 1 आशा राऊत, उपायुक्त अतिक्रमण विभाग सोमनाथ बनकर, मुख्य अभियंता पाणी पुरवठा नंदकिशोर जगताप आणि उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन विभाग संतोष वारुळे यांच्यासह संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: