Pune PMC News | सत्ताधारी पक्षाच्या माजी नगरसेवकांच्या वादात फुटपाथचे काम रखडले! | ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर नागरिकांची कारवाईची मागणी 

Homeadministrative

Pune PMC News | सत्ताधारी पक्षाच्या माजी नगरसेवकांच्या वादात फुटपाथचे काम रखडले! | ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर नागरिकांची कारवाईची मागणी 

Ganesh Kumar Mule May 05, 2025 7:07 PM

Water problem of Baner Balewadi | बाणेर बालेवाडी च्या गंभीर पाणी प्रश्ना बाबत महापालिका अधिकारी निष्क्रिय | अमोल बालवडकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पदाधिकाऱ्यांचे  ४ ते ५ तास ठिय्या आंदोलन
Tukaram Maharaj Bij | इंद्रायणी नदीचे पाणी पिण्याकरीता वापरण्यास मनाई  | श्री तुकाराम महाराज बीज सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मनाई आदेश लागू
10th and 12th exams | दहावी, बारावी परीक्षेच्या तारखा ठरल्या | जाणून घ्या काय आहे तारीख

Pune PMC News | सत्ताधारी पक्षाच्या माजी नगरसेवकांच्या वादात फुटपाथचे काम रखडले! | ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर नागरिकांची कारवाईची मागणी

 

Pune News -(The Karbhari News Service) – शहरातील प्रभाग क्रमांक १९ मध्ये भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय (Bhavani Peth Ward Office) अंतर्गत शंकर शेठ रस्त्यावर एकबोटे कॉलनीत फूटपाथ दुरुस्ती करण्याचे काम सुरू आहे. मात्र हे काम मार्च पासून सुरू आहे. या कामावरून सत्ताधारी भाजपच्या माजी नगरसेवकामध्ये जुंपली आहे. त्यामुळे या कामात दिरंगाई झाली आहे. मात्र याचा थेट फटका नागरिकांना बसत आहे. ठेकेदार देखील सत्ताधारी पक्षाचा असल्याने कामात  जाणीवपूर्वक उशीर केला जात आहे. असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. तसेच संबंधित ठेकेदार आणि याला जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

३२ लाखांची निविदा 

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडून एकबोटे कॉलनीत फूटपाथ दुरुस्ती करण्याबाबत निविदा प्रक्रिया सुरु केली होती. मूळ निविदेची रक्कम ३३ लाख २५ हजार होती. प्रशासनाने प्रक्रिया सुरू केल्यानंतर १% कमी दराने ही निविदा आली. असे एकूण ३२ लाख ९२ हजार २४३ रुपयाचे चे हे काम होते. संबंधित ठेकेदाराला १९ मार्च काम करण्याचे आदेश देण्यात आले होते. उप अभियंता उपेंद्र वैद्य आणि शाखा अभियंता देवेंद्र सिंग राजपूत यांच्या देखरेखी खाली हे काम सुरू आहे. मात्र मार्च पासून आतापर्यंत याचे काम पूर्ण झाले नाही. उलट परिसरात वाहतुकीची कोंडी वाढत चालली आहे. कारण हा रस्ता वर्दळीचा आहे. याच परिसरातून स्वारगेट कडे देखील जात येते. त्यामुळे मोठ्या वाहनांची देखील रस्त्यावर वर्दळ असते. मात्र फूटपाथ चे काम पूर्ण न झाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

कामाला राजकीय रंग 

काही नागरिकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले कि, राजकीय वादात हे काम अडकले आहे. कारण हे काम जो ठेकेदार करत आहे तो भाजपच्या माजी नगरसेवकाचा जवळचा नातेवाईक आहे. तर त्याच परिसरात असणाऱ्या भाजपच्या माजी नगरसेवकाला त्रास देण्याच्या हेतूने हे फूटपाथ चे काम जाणीवपूर्वक लांबवले जात आहे. असे नागरिकांनी सांगितले. मात्र सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या या वादाने आता नागरिक चांगलेच संतापले आहेत.

स्थानिक आमदारानी लक्ष घालण्याची मागणी

दरम्यान या प्रकरणात स्थानिक आमदार हेमंत रासने यांनी लाख घालावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. आपला मतदारसंघ आदर्श करण्यासाठी रासने हे खूप प्रयत्न करत आहेत. त्यांच्याच मतदारसंघात अशा प्रकारे कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाने आश्चर्य व्यक्त केले जात आहे आणि आमदाराने लक्ष घालून हे प्रकरण मिटवावे, अशी मागणी केली आहे. कारण परिसरात वाहतूक कोंडी वाढली आहे. आमदारांनी लक्ष घातले तर हे प्रकरण धसास लागेल, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.

——

फूटपाथ च्या कामाला उशीर झाला आहे, हे मान्य आहे. मात्र याला तांत्रिक कारणे आहेत. या कामात EWC पाइपचा वापर करणे, ठेकेदारावर बंधनकारक होते. मात्र ठेकेदाराला तसा पाईप न मिळाल्याने उशीर झाला. तसेच या कामासाठी महापालिकेने नेमून दिलेल्या थर्ड पार्टी कडून त्रयस्थ गुणवत्ता नियंत्रण करण्यात येत आहे. कामाच्या गुणवत्ते बाबत वेळोवेळी टेस्टिंग केली जाते. यामुळे या कामात उशीर झाला. मात्र येत्या दोन दिवसात आम्ही हे काम पूर्ण करणार आहोत.

उपेंद्र वैद्य, उप अभियंता.