Pune PMC News | शिक्षण विभागाच्या डिजिटल क्लासरूमच्या कामाची तपासणी केल्याशिवाय निविदांना मान्यता देऊ नये | माजी नगरसेवकांची आयुक्त आणि स्थायी समिती अध्यक्ष यांच्याकडे मागणी 

Homeadministrative

Pune PMC News | शिक्षण विभागाच्या डिजिटल क्लासरूमच्या कामाची तपासणी केल्याशिवाय निविदांना मान्यता देऊ नये | माजी नगरसेवकांची आयुक्त आणि स्थायी समिती अध्यक्ष यांच्याकडे मागणी 

Ganesh Kumar Mule Feb 28, 2026 4:30 PM

Pune Speed Breakers | महापालिका पथ विभागाने शास्त्रीय मानकांप्रमाणे असलेले स्पीड ब्रेकर दाखवावे  | प्रति स्पीड ब्रेकर १०० रुपये बक्षीस देऊ 
MLA Sunil Kamble | आमदार सुनील कांबळे  महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित
Warje Water Problem | वारजे परिसरातील नागरिकांच्या पाण्याबाबत पाणीपुरवठा विभाग प्रमुखांचा हलगर्जीपणा | माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांचा आरोप | महापालिकेवर मोर्चा आणण्याचा दिला इशारा

Pune PMC News | शिक्षण विभागाच्या डिजिटल क्लासरूमच्या कामाची तपासणी केल्याशिवाय निविदांना मान्यता देऊ नये | माजी नगरसेवकांची आयुक्त आणि स्थायी समिती अध्यक्ष यांच्याकडे मागणी

 

PMC Education Department – (The Karbhari News Service) – शिक्षण विभागाच्या डिजिटल क्लासरूम बाबत परिमंडळ २ च्या वतीने निविदा मागवल्या आहेत. मात्र याची तपासणी करण्याची मागणी माजी नगरसेवक उज्वल केसकर, प्रशांत बधे आणि सुहास कुलकर्णी यांनी महापालिका आयुक्त आणि स्थायी समिती अध्यक्ष यांच्याकडे केली आहे. तसेच तपासणी केल्यानंतरच या निविदा प्रक्रियेला मान्यता द्या, असे माजी नगरसेवकांनी म्हटले आहे. (Pune News)

 

माजी नगरसेवकांच्या निवेदनानुसार  एक मार्चपासून नवीन निविदा खरेदीवर महापालिका आयुक्त यांनी  बंदी घातली आहे. २८ तारखेला म्हणजे बंदीच्या एक दिवस आधी उपायुक्त झोन क्रमांक २ यांनी एक जाहिरात प्रसिद्ध करून निविदा मागवल्या. एकाच प्रकारचे काम वेगवेगळ्या शाळांमध्ये असताना प्रत्येक काम वेगळे लावले.
एका शाळेमध्ये जितकी कामे होती त्याची एकत्र निविदा काढणे गरजेचे होते. त्यामुळे प्रत्येक काम स्वतंत्र असल्यामुळे ते उपायुक्त यांच्या अधिकार कक्षामध्ये येते ना प्रभाग समितीला जाते ना अतिरिक्त आयुक्तांच्याकडे जाते. अशा प्रकारच्या चलाखीने ही निविदा बरोबर एक दिवस अगोदर काढली आहे. असा आरोप करण्यात आला आहे.

डिजिटल क्लासरूम चे एकंदर सव्वा दोन कोटी रुपयांचं काम आहे. पण ते सगळ्या वेगळ्या निविदा काढल्या आहेत. या ठिकाणी काय परिस्थिती आहे? शिक्षण विभागाने  या क्लासरूम करण्यासंबंधी काही पत्रव्यवहार केला आहे का ? याची तपासणी होणे आवश्यक आहे. या संपूर्ण प्रकरणाची तपासणी केल्याशिवाय या निविदांना मान्यता देऊ नये.  अशी मागणी करण्यात आली आहे.


ही निविदा रद्द करण्यात आली आहे. केवळ वर्तमानपत्रात निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत. ही निविदा प्रक्रिया महाटेंडर वर वर अपलोड करण्यात आलेली नाही.

 

| संतोष वारुळे, उपायुक्त.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: