Pune PMC News | मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समस्येबाबत आढावा बैठक | राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचा 6 ते 8 ऑगस्ट रोजी दौरा
Pune News – (TheKarbhai News Service) – महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ (मंत्री दर्जा) व सदस्य गोरक्ष लोखंडे (सचिव दर्जा) हे बुधवार 6 ते 8 ऑगस्ट 2025 दरम्यान पुणे जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.
बुधवार 6 ऑगस्ट रोजी अध्यक्ष व सदस्य हे आयुक्त पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या समवेत मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समस्येबाबत आढावा बैठक व दलित वस्ती, रमाई घरकुल योजनेचा आढावा व कामाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर ते झोपडपट्टी पुनवर्सन प्राधिकरणाचे अधिकारी व विकसक यांच्यासोबत झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प पात्र व अपात्र नागरिकांच्या गैरसोयीबाबत आढावा बैठक घेणार आहेत.
गुरुवार 7 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत शासकीय विश्रामगृह (आयबी) येथे जिल्ह्यातील बारामती, खेड, देहू, दौंड, चाकण, तळेगाव दाभाडे, सासवड, इंदापूर, भोर, आंबेगाव, मंचर, जेजुरी चे मुख्याधिकारी यांच्यासोबत दलित वस्ती रमाई घरगुल योजनेचा आढावा, कामाची पाहणी भेटी व तपासणी करणार आहेत.
शुक्रवार 8 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वा. ते सायं. 6 वाजेपर्यंत सर्व नगरपालिकांच्या कामांची तपासणी व सर्व नगरपालिका यांना प्राप्त होणाऱ्या महसूलांच्या एकूण 5 टक्के निधी आस्थापना वजा खर्च आर्थिक दुर्बल घटकांवर केलेल्या खर्चाची मागणी 5 वर्षाचा आढावा व कामाची तपासणी करणार आहेत.
आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांना पुणे दौऱ्यादरम्यान ज्यांना भेट घ्यावयाची आहे त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण विशाल लोंढे यांनी केले आहे.
अरविंद माळी नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार
दरम्यान महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष हे पुणे महानगरपालिकाच्या मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समस्येबाबत आढावा बैठक घेणार आहेत. त्यांच्याशी समन्वय साधण्यासाठी महापालिकेने उपायुक्त अरविंद माळी यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे, अतिरिक्त आयुक्त ,ए जे प्रदीप चंद्रन यांनी हे आदेश जारी केले आहेत.
COMMENTS
माहीती घेऊन काय करणार?