Pune PMC News | बाणेर येथील मागासवर्गीय व आदिवासी विद्यार्थिनींसाठी निवासी शिक्षण केंद्रांचे लवकरच पूर्ण होणार!

HomeBreaking News

Pune PMC News | बाणेर येथील मागासवर्गीय व आदिवासी विद्यार्थिनींसाठी निवासी शिक्षण केंद्रांचे लवकरच पूर्ण होणार!

Ganesh Kumar Mule Mar 27, 2026 10:06 PM

Traffic School | PMC Pune | पुणे महापालिकेच्या वाहतूक पाठशाळेत १७०० मुलांना प्रशिक्षण |महापालिका पथ विभागाची माहिती
Promotion committee | PMC pune | पदोन्नतीने टॅक्स विभागात येण्यासाठी समितीची बैठक होण्याआधीच जोरदार लॉबिंग!  | प्रशासन अधिकारी व अधीक्षक होण्यासाठी बरेच इच्छुक 
Dr. Siddharth Dhende | नागपूर चाळ, फुलेनगरमधील झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करा | माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांची मागणी

Pune PMC News | बाणेर येथील मागासवर्गीय व आदिवासी विद्यार्थिनींसाठी निवासी शिक्षण केंद्रांचे लवकरच पूर्ण होणार!

 

PMC Standing Committee – (The Karbhari News Service) – बाणेर येथील मागासवर्गीय व आदिवासी विद्यार्थिनींसाठी निवासी शिक्षण केंद्र उभारण्याच्या सुमारे १.७९ कोटी रुपयांच्या प्रकल्पाच्या प्रस्तावाला महापालिकेच्या स्थायी समितीने मंजूरी दिली. अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. दरम्यान, त्याचे बांधकाम सुरू झाले असून लवकरच प्रकल्प पूर्ण होणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. (Shrinath Bhimale PMC)

महापालिकेच्या भवन विभागामार्फत हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. बाणेर येथील सर्व्हे क्रमांक ८८+६५ ब तसेच ५४/१, ५४/२, ५४/३ या ठिकाणी विद्यार्थिनींसाठी निवासी शिक्षण केंद्र उभारण्याचे नियोजन आहे. या कामासाठी निविदा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. एकूण सहा निविदा प्राप्त झाल्या, त्यापैकी तीन पात्र तर तीन अपात्र ठरल्या. सर्वात कमी दराची निविदा स्वीकारण्याची शिफारस करण्यात आली असली तरी संबंधित दर प्रचलित बाजारभावाशी सुसंगत नसल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. त्यामुळे ठेकेदाराकडून अतिरिक्त परफॉर्मन्स सिक्युरिटी डिपॉझिट (एफडी) घेण्यात आले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

या कामाच्या एकूण खर्चात जीएसटी, रॉयल्टी व मटेरिअल टेस्टिंग शुल्काचा समावेश असून, एकूण खर्च सुमारे २ कोटी १६ लाख रुपयांपर्यंत जाणार आहे. हा खर्च २०२५-२६ च्या अंदाजपत्रकातील ‘शहरात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे उभारणे’ या अर्थसंकल्पीय शीर्षकातून भागवण्यात येणार असून, यासाठी सुमारे ३ कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध आहे.

दरम्यान, या प्रकल्पामुळे मागासवर्गीय व आदिवासी विद्यार्थिनींसाठी सुरक्षित व सुसज्ज निवासी सुविधा उपलब्ध होणार आहेत. शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थिनींना राहण्याची सोय आणि शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: