Pune PMC News | लोहगाव मधील हॉस्पिटल, बगीचा, क्रीडांगण चे आरक्षण बदलून केले जाणार संगीत कला, मैफिल केंद्र!

Homeadministrative

Pune PMC News | लोहगाव मधील हॉस्पिटल, बगीचा, क्रीडांगण चे आरक्षण बदलून केले जाणार संगीत कला, मैफिल केंद्र!

Ganesh Kumar Mule Nov 18, 2025 7:48 PM

Measles | Pune | गोवर संसर्ग रोखण्यासाठी दहा कलमी कार्यक्रम राबवावा | आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या सूचना, अतिरिक्त लसीकरणही करणार
Agniveer Bharti 2025 | अग्निवीर निवड चाचणीसाठी १० एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
Metro | Smart City | SRA | गरवारे महाविद्यालय ते न्यायालय मेट्रो मार्गाचे काम २६ जानेवारीपर्यंत पूर्ण करा |मेट्रो, स्मार्ट सिटी, एसआरएचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

Pune PMC News | लोहगाव मधील हॉस्पिटल, बगीचा, क्रीडांगण चे आरक्षण बदलून केले जाणार संगीत कला, मैफिल केंद्र!

 

Lohgaon Pune – (The Karbhari News Service) –  लोहगाव स.न.२३६ व २३८ या जागेमधील क्रीडांगण, बगिचा, हॉस्पिटल, भाजी मंडई  आरक्षण बदलून त्या  ऐवजी पुणे शहराच्या शाश्वत विकासासाठी नवि दिल्ली येथील “भारत मंडपम” च्या धर्तीवर सांस्कृतिक चळवळ, संगीत कला केंद्र, संगीत मैफिल केंद्र निर्माण केले जाणार आहेत.  या बाबतचा प्रस्ताव शहर सुधारणा समिती समोर मंजुरी साठी ठेवण्यात आला आहे. दरम्यान या प्रस्तावाला मुख्य सभेची मान्यता मिळाल्यानंतर यावर नागरिकांच्या हरकती आणि सूचना घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर पुन्हा हा अहवाल राज्य सरकारला पाठवण्यात येणार आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

पुणे पेठ लोहगाव स.न.२३६ व २३८ या भूखंडामध्ये मध्ये पार्किंग (P-67), हॉस्पिटल (H-16), गार्डन (G), वॉटर वर्क्स (WW-6), भाजी मंडई (VM-३३), क्रीडांगण (PG) या सर्व आरक्षणाचे वापर बदल करून त्यांचे सर्व क्षेत्र “भारत मंडपम” या प्रयोजनार्थ निर्देशित करणेसाठी महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ अन्वये मान्य विकास योजनेमध्ये बदल करणेस तसेच सदर भूखंडातील सर्व डी.पी. रस्ते रद्द करून त्याऐवजी पश्चिम हद्दीवरील ३०.०० मी. रुंद रस्त्यापासून अस्तित्वातील २२.०० मी. रुंद रस्त्यापर्यंत उत्तरेस त्याच हद्दीलगत २४ मी. रुंद रस्ता प्रस्तावित करणेस व पूर्व पश्चिम २२.०० मी रुंद अस्तित्वातील रस्ता, ३०.०० मी रुंद कलम २०५ अन्वये आखलेला रस्ता कायम ठेवणेचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. यावर आता २० नोव्हेंबर च्या सभेत निर्णय होणार आहे. (PMC City Enginerr Office)

पुणे महानगरपालिकेच्या सन १९८७ च्या मंजूर विकास योजनेमध्ये संपूर्ण क्षेत्र रहिवासी विभागात समाविष्ट होते. तद्वंतर सुधारित मंजूर विकास योजनेमध्ये संपूर्ण क्षेत्रावर म्हणजेच सुमारे १९.७३ हेक्ट क्षेत्रावर EP-131 द्वारे शासन स्तरावर खालीलप्रमाणे प्रस्तावित आरक्षणे आहेत – ) बगिचा, २) क्रीडांगण, ३) भाजी मंडई व वॉटर वर्क्स, ४) हॉस्पिटल, ५) पार्किंग व ६) विकास योजना रस्ते. सन १९८७ च्या विकास योजनेत सदर मिळकत हि रहिवास क्षेत्रात होती. त्यांनतर सन २०१७ च्या विकास योजनेत काही आरक्षण सदर १मिळकतीवर शासनाद्वारे लागू करण्यात आले. सदर मिळकतीचे एकूण क्षेत्र १९.७३ हेक्टर असून या संपूर्ण क्षेत्रावर आरक्षणे प्रस्तावित केली असल्याने विकसन योग्य क्षेत्र राहिलेले नाही. सदर मिळकतीच्या लगत असलेली सर्व्हे न.२१५ या मिळकतीच्या ५०० मी. अंतरावर एक मोठे गार्डन आहे. तसेच सदरचे मिळकत क्षेत्र हे पुण्याच्या विमानतळाजवळ आहे. अशाप्रकारे सदर मिळकत हि पुणे शहराच्या केंद्रस्थानी लोहगाव विमानतळाजवळ व महत्वाच्या ठिकाणी असल्याने तेथे पुणे शहराच्या विकासाच्या अनुषंगाने, पुणे शहराच्या शाश्वत विकासासाठी तेथे नवी दिल्ली येथील “भारत मंडपम्” नावाचे अधिवेशन केंद्रासारखे केंद्र पुणे शहराशी सुसंगत अशी सांस्कृतिक चळवळ, संगीत कला केंद्र, संगीत मैफिल केंद्र अशा प्रकारच्या उपक्रम सदरच्या मिळकतीवर उभारण्यात यावे असे आरक्षण प्रस्तावित करावे अशी विनंती आमदारांनी  केलेली होती.

पुणे पेठ लोहगाव स.न. २३६ व २३८ मध्ये महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ चे कलम २६ (१) अन्वये पार्किंग (P-67), हॉस्पिटल (H-16) व भाजी मंडई (VM-33) हे आरक्षण प्रस्तावित केलेले आहेत. महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ चे कलम २८ (४) अन्वये पूर्वी मान्य कलम २६ (१) अन्वये पार्किंग (P-67) व भाजी मंडई (VM-33) आरक्षणे कायम ठेऊन हॉस्पीटल (H-16) हे आरक्षण रद्द करून निवासी झोनमध्ये प्रस्तावित केले होते. तसेच भाजी मंडई (VM-33) मध्ये वॉटर वर्क्स (WW-6) हे आरक्षण प्रस्तावित केले होते. तनंतर महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ३१ (१) अन्वये हरकती सूचना मागवून दि.१७/०२/२०१८ चे अधिसूचने नुसार EP-131 चे ३०.०० मी. रस्त्याच्या उत्तरेस क्रीडांगण (PG) व दक्षिणेस गार्डन (G) आरक्षण प्रस्तावित केले आहे. लोहगाव स.न.२३६ व २३८ मध्ये एकूण ६ आरक्षणे पार्किंग (P-67), हॉस्पिटल (H-16), भाजी मंडई (VM-33), वॉटर वर्क्स (WW-6), गार्डन (G) व क्रीडांगण (PG) असे आरक्षण अंतिम करण्यात आले आहे.
विकास योजना आराखडा मंजुरी देतेवेळी मंजूर लेआऊटमधील ओपन स्पेस वर प्रस्तावित केलेली आरक्षणे (Recreation Spaces) रद्द केल्यामुळे Recreation Purpose च्या आरक्षणाची कमतरता निर्माण झाली आहे. Urban and Regional Development Plan Formulation and Implementation Guidelines
अन्वये १४% ते १६% Recreation Purposes आवश्यक आहे. तथापि महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ चे २६ (१) च्या रिपोर्टनुसार सेक्टर V मध्ये Recreation Purpose चे प्रमाण ५.१६% एवढेच उपलब्ध राज्यातील शहरांच्या विकास योजनांमध्ये क्रीडांगणासाठी आरक्षित असणाऱ्या जागांमध्ये कोणताही बदल
येऊ नये असे नमूद आहे.

अधिक्षक अभियंता (प्रकल्प) पुणे महानगरपालिका यांनी “मंजूर विकास योजना, पुणे मौजे लोहगाव स.न.२३६ व २३८ मधील पार्किंग (P-67) आरक्षणाची जागा पार्किंग करिता राखीव असल्याने सदरची जागा पार्किंग वापरासाठी विकसित करणे आवश्यक आहे.” असा अभिप्राय दिलाआहे. तसेच  उद्यान विभाग यांनी “विषयांकित जागेवरील जवळपासच्या भागात कोणतेही उद्यान नाही. तसेच संजय पार्क, लोहगाव येथील परीसरात अल्प उत्पन्न गटातील नागरिक राहत असून या जागेवर उद्यानाची आवश्यकता आहे. सदरील भागातील नागरिकांची उद्यानासाठी वारंवार मागणी होत असते. तरी सदरची जागा उद्यानास मिळणे आवश्यक आहे. तसेच विषयांकित मिळकतीवरील उद्यानाचे आरक्षण कायम ठेवणे योग्य राहील असे खात्याचे मत आहे” असा अभिप्राय दिलेला आहे.

यापूर्वी  आरक्षणे प्रस्तावित करणेबाबत शासन स्तरावर निर्णय होणेकरिता यापूर्वी अहवाल पाठविणेत आला होता. त्यानंतर  प्रधान सचिव यांकडे पुणे शहराच्या केंद्रस्थानी, पुण्याच्या लोहगाव विमानतळाजवळ व महत्वाच्या ठिकाणी असल्याने पुणे पेठ लोहगाव स.न. २३६ व २३८ येथे पुणे शहराच्या विकासाच्या अनुषंगाने, पुणे शहराच्या शाश्वत विकासासाठी तेथे नवी दिल्ली येथील “भारत मंडपम सारख्या मोठ्या सार्वजनिक हिताच्या दृष्टीने प्रकल्प पुणे शहराशी अशी विषयांकित मिळकतीवर उभारण्या हेतू शासन स्तरावर यथायोग्य निर्देश होणेस पुणे महानगरपालिकेने विनंती केली होती.

त्यावर अवर  सचिव, महाराष्ट्र शासन यांनी केंद्र शासनाच्या “भारत मंडपर प्रकल्पाच्या धर्तीवर मी. लोहगांव, ता. हवेली, जि.पुणे येथील मन्हें क्र. २३६ व क्र. २३८ ही जागा महानगरपालिकेच्या मंजूर विकास योजनेमध्ये आरक्षित ठेवणे बाबत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचन अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अन्वयेची फेरबदलाची कार्यवाही पूर्ण करून सदर फेरबदलाचा परिपूर्ण प्रस्ताव पुणे महानगरपालिकेने शासनाच्या मान्यतेसाठी सादर करावा. त्यावर शासनस्तरावरुन गुणवत्तेनुसार निर्णय घेण्यात येईल.” असे सूचित करण्यात आले होते. त्यानुसार महापालिकेने प्रस्ताव तयार केला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: